News Flash

‘जय’च्या मृत्यूचे सावट गडद

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला लावणाऱ्या ‘जय’ या वाघाच्या मृत्यूच्या संशयाचे सावट अधिक गडद झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला लावणाऱ्या ‘जय’ या वाघाच्या मृत्यूच्या संशयाचे सावट अधिक गडद झाले आहेत. पवनी तालुक्यातील कोथुर्डी येथून किसन ईस्तारी समर्थ आणि मधुकर मुरलीधर हटवार या दोन संशयितांना मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून नायलॉनचा दोर आणि इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आली आहे. मात्र, ‘जय’च्या मृत्यूसंदर्भात कोणतीही माहिती हाती आलेली नाही, अशी भूमिका वनखात्याने घेतली आहे.
उमरेड-करांडला अभयारण्यातून ‘जय’च्या बेपत्ता होण्याची माहितीही पर्यटकांमुळेच समोर आली आणि प्रसारमाध्यमांच्या दबावानंतर त्याची शोधमोहीम सुरू झाली होती. दरम्यान, ‘जय’ जिवंत आहे की मरण पावला यावर दररोज खलबते होत आहेत. संशयितांना जेथून ताब्यात घेतले, त्या कोथूर्डीत सामूहिकरीत्या वीजप्रवाह सोडून वन्यप्राण्यांच्या शिकारी केल्या जातात. चोरखामारा या गावातही याच पद्धतीने वन्यप्राण्यांच्या शिकारी केल्या जात होत्या. कोथुर्डीतूनच या संशयितांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे ‘जय’चीही वीजप्रवाह सोडून तर शिकार झाला नसावी ना, यावर दाट शंका व्यक्त होत आहे.
यासंदर्भात कारवाई एसआयटी व सीबीआयच्या चमूने संयुक्तरित्या केल्याचे संदेश समाजमाध्यमांवर सायंकाळपासूनच फिरत होते. त्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान व विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ट यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, अशा कोणत्याही एसआयटीची नियुक्ती आम्ही केलेली नाही. सीबीआयसुद्धा जोपर्यंत वनखाते प्रकरण त्यांच्याकडे सोपविणार नाही, तोपर्यंत स्वत:च या प्रकरणाची चौकशी करणार नाही, त्यामुळे जोपर्यंत आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून या वृत्ताला बळकटी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही सांगू शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 6:18 am

Web Title: jai tiger mysterious death
Next Stories
1 स्वातंत्र्यदिनी तरुणाईसह भाजप नेत्याच्या मुलाचा ‘यादवी’ धुडगूस!
2 रेल्वेत ‘साहेबां’च्या सलूनवर लाखोंचा खर्च
3 नीलिमा देशमुखांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यास दोन्ही विभागांचा नकार
Just Now!
X