गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे नामांकनप्राप्त, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असणारे तबलावादक, नागपूरभूषण डॉ. प्रशांत गायकवाड यांना नुकतेच ओडिशाचे राज्यपाल गणेशीलाल यांच्या हस्ते  ‘भारतीय कलाश्री सन्मान-२०१९’ ने पुरस्कृत करण्यात आले. भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसाराच्या योगदानाकरिता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या डॉ. प्रशांत गायकवाड यांनी परिश्रम आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. सुमारे ४७ देशांमध्ये मार्गदर्शन करणारे ते पहिले भारतीय आहेत. संस्कृती, संगीत, दर्शनशास्त्र, भारतीय चालीरिती, रूढी, परंपरा आदीबाबत त्यांचा दांडगा अभ्यासआहे.

त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राजा मानसिंह तोमर विश्वविद्यालय, अ.भा.गा. महामंडळ मुंबईसह अनेक विश्वविद्यालय तसेच केंद्र सरकारचे परीक्षक म्हणून ते काम पाहतात. सिव्हिल लाईन्स येथील भारतीय विद्या भवन येथे संगीत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरावरून या आंतरराष्ट्रीय उपलब्धीकरिता अभिनंदन होत आहे.  डिसेंबर २०१८ मध्ये आयोजित  ‘ब्रम्हपुत्र कला महोत्सवा’च्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजनात लोकसंगीतावर प्रदर्शन, कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात संगीत, भारतीय संस्कृती, लोककला, नृत्य, ज्योतिष्यशास्त्रावर त्यांनी मार्गदर्शन केले. यात ४७ देशातील कलावंत सहभागी झाले होते.