अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय उपराजधानीत आल्यावर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या घटनात्मक कार्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लोकसहभागातून निधी संकलन करण्याचा निर्णय घेऊन तसे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या निधी संकलनाला महामंडळाचे कार्यालय असलेल्या नागपुरातून नव्हे, तर यशंवतराव चव्हाणांची कर्मभूमी असलेल्या कराडने प्रतिसाद दिला असून तेथील एका शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी १० हजार रुपयाचा निधी महामंडळाकडे सोपविला.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या आपल्या घटनात्मक कार्याची खरोखरच अंमलबजावणी करायची असेल तर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या ५ लाखांपैकी केवळ २५ हजार रुपये उरतात. त्यात ते शक्य नसल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत याबाबत चर्चा झाली. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी ज्या संस्था काम करतात त्यांच्याकडून निधी संकलन महाकोषासंदर्भातील विषय बैठकीत चर्चेला आल्यावर निधी संकलन समिती स्थापन करून लोकसहभागातून निधी संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व सदस्य रवींद्र बेडकिहाळ यांनी या विविध उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १ रुपया व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी १० रुपये देऊन महामंडळाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले होते. गेल्या महिन्याभरात विदर्भात निधी संकलनाला प्रतिसादच मिळाला नाही. मात्र, कराडमधील शिवाजी शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय व वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी १० हजार रुपयाचा धनादेश महामंडळाकडे सोपविला.
मराठी भाषा, साहित्य संस्कृती यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अनेक धोरणे आखली, त्यामुळे या निधी संकलनाच्या मोहिमेचा जाहीर शुभारंभ त्यांच्याच कर्मभूमीत कराड येथील त्यांनीच स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेतून व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करणारे निवेदन रवींद्र बेडकिहाळे यांनी या शिक्षण संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रकाशबाबू पाटील यांनी दिले होते. त्यानुसार महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी १० हजाराच्या देणगीचा धनादेश बेडकिहाळ यांच्या स्वाधीन करण्यात आला.

marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?