खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्षे पूर्ण

भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजी येथे एका दलित कुटुंबातील सामूहिक हत्याकांडाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. भैयालाल भोतमांगे यांची  पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या करण्यात आली होती. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरही एक काळा डाग ठरली होती. या घटनेला उद्या, गुरुवारी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या नरसंहारातून बचावलेले भैयालाल भोतमांगे हे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
mumbai high court,
दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर उच्च न्यायालय आज निर्णय देणार, प्रदीर्घ सुनावणीनंतर गेल्या वर्षी निर्णय राखून ठेवला होता
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

आक्रोशाचे पडसाद देशपातळीवर

खैरलांजी हत्यांकाडाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उमटले. ठिकठिकाणी आंदोलने झाली, जाळपोळीच्या घटनाही घडल्या. नागपूरच्या दीक्षाभूमीवर २००६च्या २ ऑक्टोबरला बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचे ५०वे वर्ष साजरे होणार होते आणि २९ सप्टेंबरला भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजी या छोटय़ाशा गावात भैयालाल भोतमांगे या दलिताचे सारे कुटुंबच एका गटाने अमानुषपणे हत्या करून संपवून टाकले. भैयालालची पत्नी सुरेखा मेहनती होती आणि मुले प्रियंका, सुधीर आणि रोशन शिक्षण घेत होती व सन्मानाने हे कुटुंब जगत होते. सुरेखा समोर अन्याय

झाला तर ती पोलिसांच्या समोर आरोपींविरुद्ध साक्षही देत होती. हे कुटुंब दलित असूनही गयावया न करता सन्मानाने जगते, कुणाच्या वळचणीला नाही. याचा राग गावातील दलितेतरांचा होताच. त्यातून सर्वाच्या रागाचा भडका उडाला आणि ही घटना घडली.

या घटनेनंतर एक-दीड महिना दलित हत्याकांड आणि अ‍ॅट्रॉसिटी, सुरेखाचे चरित्रहनन, बलात्कार वगैरे  गोष्टींवरच चर्वितचर्वण सुरू होते. मात्र, दलित नेत्यांनी पोकळ भाषणे करण्याशिवाय काहीही केले नाही. तेव्हा सामान्य दलितांच्या भावनांचा उद्रेक केवळ राज्यातच नव्हे तर देशभर उडाला आणि देशभरातील राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. सरकारने भैयालाल भोतमांगे यांना मदत केली,  संघटना आणि विविध पक्षांनी या मुद्दावर सोयीचे राजकारण केले. कालांतराने हा  मुद्दा पडद्याआड गेला. दहा वर्ष होत आली, भैय्यालाल न्याय मागतो आहे. सामान्य दलितांसाठी हे प्रकरण फक्त एका कुटुंबातील हत्याकांडापुरते मर्यादित नव्हते, समाजावर होत असलेल्या अत्याचाराचे ते प्रतीक मानले गेले व म्हणून त्याविरुद्ध झालेला उठाव हा सार्वत्रिक होता. आताही सामान्य दलित सुरेखा भोतमांगे आणि तिच्या मुलांच्या आठवणीत दरवर्षी पुण्यतिथी साजरी करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आश्चर्य म्हणजे भीषण, बिभत्स, क्रूर कांड होऊनही त्यात अ‍ॅट्रोसिटी लावली गेली नाही आणि केवळ खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आजही अ‍ॅट्रोसिटी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. कायद्याने दलित व आदिवासींना दिलेले हे संरक्षण आहे. त्यामुळे काही प्रमाणात वचक आहे. त्यामुळेत तो रद्द करण्यास किंवा तो शिथिल करण्यास दलित संघटनांचा विरोध आहे.

नेमके काय घडले?

२९ सप्टेंबर २००६ मध्ये खैरलांजीत हे हत्याकांड घडले होते. घटनेच्या दिवशी गावातील दलितेतर समूहाने भोतमांगे यांच्या झोपडीला वेढा घातला आणि शिविगाळ केली. झोपडीत असलेल्यांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. भैयालाल शेतावर गेले होते. त्यामुळे ते बचावले होते. घटनेनंतर त्यांनी गाव सोडले. ते सध्या भंडारा येथे राहतात. या प्रकरणाला जातीय पाश्र्वभूमी होती.  भंडारा जलद गती न्यायालयाने या प्रकरणातील आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आव्हान देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

मला न्याय हवा आहे. माझ्या कुटुंबीयांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे – भैयालाल भोतमांगे

 

भैयालाल यांची सध्याची स्थिती

भैयालाल आज तीन खोल्यांच्या पक्क्य़ा घरात राहतात. सरकारने त्यांना भंडारा येथील म्हाडा कॉलनीत घर दिले आहे. तसेच त्यांना वसतिगृहात सुरक्षा रक्षकांची नोकरी देण्यात  आली आहे. त्यातून त्यांना १५ हजार रुपये महिन्याला मिळतात. भैयालाल यांनी त्यांचे शेत २० हजार रुपये प्रतिवर्ष या प्रमाणे भाडेपट्टीने दिले आहेत. त्यांच्या उत्पन्नाचा बराचसा पैसा सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी दिल्ली आणि मुंबईला जाण्यात खर्च होतो.

खैरलांजीचे वास्तव

खैरलांजी गावातील लोकसंख्या ८०० च्या जवळपास आहे. यात केवळ पाच घरे आदिवासींची आणि दोन घर दलितांची आहेत. कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी  दरवर्षी २९ सप्टेंबरला खैरलांजीला जात असतो. गावात माझ्याशी कुणीही बोलत नाही. तेथे अजूनही माझ्या जीवाला धोका असल्याचे मला वाटते, असे भैयालाल म्हणाले.

तेव्हा आणि आता

दलितांवरील अत्याचार कुठेही कमी झालेले नाहीत. खैरलांजीपासून ते उनापर्यंत गेल्या दहा वर्षांत दलित अत्याचारांच्या घटना सातत्याने घडत आहेत.

लोखंडी पलंग

भैयालाल भोतमांगे खैरलांजी येथे एका झोपडीत पत्नी सुरेखा (४५), मुलगा सुधीर (२१), रोशन (१९) आणि मुलगी प्रियंका (१७) यांच्यासोबत राहत होते. आता येथे दरवर्षी खैरलांजी नरसंहार दिनी (२९ सप्टेंबरला) दलित-बुद्धिस्ट संघटनांच्या वतीने मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली जाते. भोतमांगे यांची झोपडी नष्ट झाली असून तेथे केवळ एक लोखंडी खाट तेवढी आहे. अमानुष हत्याकांच्या स्मृती म्हणून ती खाट तेथे ठेवण्यात आली, असे भैयालाल सांगतात.

घटनाक्रम

  • नरसंहार

२९ सप्टेंबर २००६ ला खैरलांजी या गावातील एक जमावाने लाठय़ा काठय़ांनी हल्ला केला आणि भोतमांगे कुटुंबातील चारजणांना ठार केले. त्यात सुरेखा आणि तिची मुले सुधीर, रोशन आणि प्रियंका यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

  • मूळ

धुसाळा गावातील सिद्धार्थ गजभिये या जमीन मालकाने खैरलांजी येथील काही महिला कामगारांची मजुरी दिली नसल्याचा आरोप होता. त्यावरून गजभिये आणि गावातील नागरिकांमध्ये भांडण झाले होते. यावेळी गजभिये यांनी अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत तक्रार केली होती. नंतर ते आरोप वगळण्यात आले.

  • चौकशी

हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे आणि नंतर सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींची संख्या ५० वरून ११ वर आली.

  • मृत्यूदंड

भंडारा येथील जलद गती न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. दास यांनी २० सप्टेंबर २००८ ला आठ आरोपींनी खून केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आणि इतर तिघांना निर्दोष ठरवण्यात आले. (अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा लावण्यात आला नाही.)

  • जन्मठेप

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जलद गती न्यायालयाचे सर्व पैलू मान्य केले. परंतु अतिदुर्मीळातील दुर्मीळ प्रकरण नसल्याचा निर्वाळा देत १४ जुलै २०१० ला फाशीऐवजी जन्मठेप सुनावली. आठजणांना २५ वर्षांची जन्मठेप सुनावली. सध्या हे गुन्हेगार नागपूच्या मध्यवर्ती तुरुंगात आहेत.

  • सर्वोच्च न्यायालय

सुरेखा भोतमांगे यांचे पती भैयालाल, सरकार आणि आरोपी यांनी वेगवेगळ्या विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. हे प्रकरण गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असून सुनावणीला आलेले नाही.