राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी, यूपीएससी, पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नाही

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : मागासगर्वीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन करून त्यांच्या प्रगतीच्या वाटा सुकर करण्याच्या हेतूने स्थापन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)च्या ढिसाळ कारभाराचे धिंडवडे निघत आहेत. संस्थेने तीन महिन्याआधी घेतलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल घोषित केलेला नाही, यूपीएससी आणि पीएचडी विद्यार्थ्यांना मदत करण्यातही संस्था अपयशी ठरली असून राज्यभरातील उमेदवार या संस्थेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

महाज्योतीने जानेवारी महिन्यात निबंध स्पर्धा आयोजित के ली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ातून तीन उमेदवाराला पात्र ठरवण्यात आले. राज्यातील १०८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. फे ब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात निकाल लागणार होता. परंतु निबंध स्पर्धेचा निकाल लागलाच नाही.

बार्टीच्या धर्तीवर संघ लोकसेवा आयोगाच्या  परीक्षेची तयारी उमेदवारांकडून करवून घेण्यासाठी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीतील खासगी प्रशिक्षण संस्थांकडून निविदा मागवली. यासंदर्भात जाहिरातीला अडीच महिने झाले. परंतु त्या योजनेचे काय झाले, उमेदवारांना प्रशिक्षण के व्हा दिले जाईल, त्यासाठी निवड प्रक्रिया कशी असेल, याबद्दल काहीही महाज्योती उमेदवारांना सांगत नाही. अशाच प्रकारे पीएचडी करणाऱ्यांसाठी योजना सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. मात्र, योजना के व्हा सुरू होईल, त्यात सहभागी होण्याचे निकष काय, यासंदर्भात संस्थेकडून उमेदवारांना मार्गदर्शन, माहिती मिळत नाही. महाज्योती कार्यालयाचे दूरध्वनी बंद राहतात किं वा उचलेले जात नाहीत, अशा अनेक तक्रारी आहेत. यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना

आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे बार्टीने तसेच टीआरटीने आदिवासी उमेदवारांना आर्थिक मदत सुरू के ली आहे. महाज्योतीने मात्र अद्याप सुरू के लेली नाही. एकू णच या संस्थेने ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या योजना हाती घ्यायला हव्या, त्यावर काम करायला हवे, तसे होत नाही, अशी तक्रार यूपीएससीची तयारी करत असलेले ऋषिके श चव्हाण यांनी केली.

गेल्या दोन वर्षांत महाज्योतीने के वळ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू के ले आहे. करोनामुळे तेही ऑनलाईन सुरू आहे. मात्र, यासाठी डिजिटल प्लेटफार्म उपलब्ध करून देणाऱ्या पुण्याच्या कन्सलटन्टचे देयक संस्थेला देता आले नाही.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपक्रम, योजना राबवण्यासाठी या संस्थेकडे कल्पना आहेत. परंतु त्या राबणारी यंत्रणा नाही. खुद्द व्यवस्थापकीय संचालक महाज्योतीच्या कार्यालयात तीन  महिन्यांपासून आलेले नाहीत. ते गोंदिया जिल्ह्य़ाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्याकडे करोनाची स्थिती हाताळण्याची जबाबदारी आहे. नागपुरात कार्यालय असलेल्या महाज्योतीला ते वेळ देऊ शकत नाही. त्यांच्याकडमून कारभार काढून नागपुरातील एखाद्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्याची मागणी होत आहे.

पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नसल्यामुळे संस्थेच्या कारभारावर मर्यादा येत आहेत. म्हणून पूर्णवेळ एम.डी. नेमण्याची आणि दर महिन्याला संचालक मंडळाची बैठक बोलावण्याची मागणी बहुजन कल्याण मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांच्याकडे के ली आहे. लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिणार आहोत.

– लक्ष्मण वडले, संचालक, महाज्योती