News Flash

‘करोनानंतरची आव्हाने’वर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान

दोन्ही संस्थांच्यावतीने दरवर्षी संयुक्तरित्या अर्थसंकल्पावर व्याख्यान आयोजित करण्यात येते.

नागपूर : राजहंस प्रकाशन आणि डॉ. दंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी, १३ फे ब्रुवारीला ‘करोनानंतरची आव्हाने’ या विषयावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कु बेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्र म होईल. या कार्यक्र मात व्याख्यानापूर्वी शहरातील कोरोनायोद्धय़ांचा सत्कार होणार आहे, अशी माहिती दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे व राजहंस प्रकाशनचे नरेश सब्जीवाले यांनी दिली. दोन्ही संस्थांच्यावतीने दरवर्षी संयुक्तरित्या अर्थसंकल्पावर व्याख्यान आयोजित करण्यात येते. मात्र, गेल्या वर्षभरात करोनाने निर्माण के लेल्या आव्हानांचा पुढचा टप्पा काय असेल, याबाबत मंथन होणे आवश्यक आहे. या विचारातून यंदा ‘करोनानंतरची आव्हाने’ हा विषय निवडण्यात आला, असे आयोजकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:18 am

Web Title: lecture by girish kuber on challenges after corona zws 70
Next Stories
1 भाजप नेते निवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणूक करतात!
2 लोकजागर : पाटलांची ‘व्यर्थ’ पायपीट!
3 स्टारबस चालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न?
Just Now!
X