• नागपूरच्या रुग्णांना ‘एमसीआर’ चपलांचे वाटप नाही
  • कुष्ठरोग निर्मूलन सोसायटीचा गोंधळ

शारीरिक संवेदना कमी झालेल्या कुष्ठरुग्णांच्या उपचाराचा एक भाग असलेल्या ‘एमसीआर चप्पल’ गेल्या दीड वर्षांपासून राज्यात केवळ नागपूर जिल्ह्य़ात वाटप करण्यात आल्या नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन सोसायटीने या चपलांची खरेदीच केली नसून त्यासाठी मिळणारा निधीही परत गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ातील ही स्थिती असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संवेदना कमी झालेल्या व विकृती आढळलेल्या प्रत्येक कुष्ठरुग्णांना वर्षांतून दोन वेळा अत्यावश्यक विशिष्ट पद्धतीच्या ‘एमसीआर’ चपलांचे नि:शुल्क वाटप केले जाते.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

या रुग्णांना उभे राहताना त्रास होऊ नये, चालताना त्यांच्या पायात खडे, गोटय़ांमुळे जखमा होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो. या चपलांकरिता केंद्र सरकारकडून राज्य शासनाला प्रत्येक वर्षी सुमारे ६० लाखाचा निधी मिळतो. शासनाकडून त्याचे प्रत्येक जिल्ह्य़ात रुग्णांच्या तुलनेत वाटप केले जाते. नागपूर जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला गेल्या दोन वर्षांपासून २.१५ लाख रुपये येत आहेत.

एवढा निधी मिळाल्यावरही नागपूरच्या जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन सोसायटीकडून चपलांची दीड वर्षांपासून खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे वर्ष २०१६- १७ चा निधी परत गेला असून वर्ष २०१७-१८ चाही निधी परत जाण्याच्या वाटेवर आहे. या सोसायटीच्या अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तर सचिव सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) असतात.

सोसायटीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा अंकेक्षण अधिकारी यांचाही समावेश असतो. या सर्व अधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावी कुष्ठरुग्णांना चप्पल उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्य़ांत कुष्ठरुग्णांकरिता चप्पल खरेदी झाली असताना केवळ येथे खरेदी झाली नसल्याने प्रत्येक वर्षी सुमारे ४०० ते ५०० जिल्ह्य़ांतील कुष्ठरुग्ण उपचार व साधनांपासून वंचित राहिले आहेत. या रुग्णांच्या पायाला जखमा होऊन गुंतागुंत वाढल्यास जवाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संदर्भ सेवा केंद्रात वाद वाढले

मेडिकल, मेयो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या संस्थांसह जिल्ह्य़ात सुमारे ६ कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रे आहेत. येथे उपचारासह रुग्णांना मोफत एमसीआर चप्पलांचे वाटप केले जाते, परंतु चपला मिळत नसल्यामुळे सर्व केंद्रांमध्ये रुग्ण वाद घालतात.

रुग्णांना त्रास होऊ देणार नाही

चप्पल खरेदीसाठी गेल्यावर्षी सोसायटीला विलंबाने निधी मिळाला. दरम्यान, रुग्णांना थेट बँक खात्यात रक्कम देण्याच्या सूचना आल्या. त्यानंतर वरिष्ठांनी चप्पल खरेदीचा सल्ला दिल्यावर जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन सोसायटीच्या अध्यक्षांना प्रस्ताव सादर केला, परंतु उत्पादक कंपनीकडून शासनाने निश्चित केलेल्या ४ पैकी १ निकष पूर्ण होत नसल्याने खरेदी झाली नाही. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून पुढे तातडीने खरेदीचे प्रयत्न केले जातील.

डॉ. माध्यमा चहांदे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), नागपूर