जगभरात ‘सेझची क्रेझ’ कमी होत असताना मुळातच विलंब झालेल्या मिहान-सेझ प्रकल्पात हवा भरण्याचे प्रयत्न नव्याने सुरू झाले आहेत. प्रत्यक्षात आतापर्यंत सुमारे २ हजार एकर जमीन उद्योग आणि विविध संस्थांना वितरित करण्यात आली असून केवळ सात ते आठ हजार रोजगार उपलब्ध होऊ शकले आहेत.

Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

मिहान प्रकल्पात सेझ, नॉन सेझ आणि डब्ल्यू आकाराच्या प्रशासकीय इमारतीमध्ये उद्योजकांना जागा देण्यात आली आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात ६४ उद्योग घराण्यांनी जमीन घेतली आहे. त्यापैकी केवळ ११ कंपन्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. एअर इंडिया-बोईंगच्या इंजिन स्टेटिंग प्रकल्पाची पायाभरणी सुरू असल्याने येथे ११०० कर्मचारी कार्यरत आहेत. मिहान प्रकल्पातील या एकमेव प्रकल्पात एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परंतु यात प्रकल्पग्रस्तांना काही वाव नाही. हा प्रकल्प एमआरओचा एक भाग आहे. एमआरओमध्ये २६ सुरक्षा रक्षक आणि दोन-तीन कर्मचारी सोडल्यास काहीही नाही.

विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर पायाभूत सुविधा विकसित करणाऱ्या कंपन्यांचा भरणा आहे. त्यानंतर अलीकडे शैक्षणिक संस्थांना जागा देण्यात येत आहेत. त्यामुळे सेझबाहेरील गुंतवणुकीतून देखील नागपूरकरांना फार काही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही.

सेझमधील किंवा बाहेरील कंपन्यांमध्ये बहुतांश सुरक्षा जवान प्रकल्पग्रस्तांची मुले आहेत. प्रकल्पग्रस्तांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन नोकरी उपलब्ध झाल्याचे उदाहरण सध्यातरी दिसून येत नाही.

प्रकल्पग्रस्तांकडून जमीन घेताना रोजगाराची संधी मिळण्याचे चित्र निर्माण करण्यात आले. ते पूर्ण होताना दिसत नसल्याने प्रकल्पग्रस्तांकडून पर्याय लिहून घेऊन नोकरीऐवजी ५ लाख रुपये रोख रक्कम देण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने घेतलेला आहे.

विदर्भाच्या औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाला गोगलगाईचा वेग असून या प्रकल्पातील एक महत्त्वाचा भाग असलेला सेझला आता जागतिक पातळीवर फारसा वाव दिसून येत नाही. सेझच्या मूळ संकल्पनेत बरेच बदल झाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठीच्या सेझला नागपुरात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

मिहान-सेझची आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर नीट मार्केटिंग झाली नाही. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीला मार्केटिंगचे काम दिले जावे, असे मिहान प्रकल्पाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना वाटत आहे.

सेझ कंपनीमधील रोजगार

एअर इंडिया-बोईंग इंक मध्ये ११०० बेरोजगारांना संधी मिळाली, कॅलिबर पाईन्ट बिझनेस सोल्युशन लिमिटेड महापे, नवी मुंबई या कंपनीत ७००, सेनोस्पिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ३५, डाएट फूड इंटरनॅशनल (मेसर्स दयालू दाल अँड ऑईल मिल) नागपूरमध्ये ५०, हास कॉर्पोरेशन प्रायव्हेट  लिमिटेडमध्ये १०५, कनव ऑग्रोनामीमध्ये ५०, लुपीन लिमिटेडमध्ये २५०, स्मार्ट दत्ता इंटरप्राईजेस (आय) लिमिटेड, मोहालीमध्ये २००, टाल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन लिमिटेड पुणेमध्ये ३५०, टाटा कन्सलटन्सी सव्‍‌र्हिस (टीसीएस) मुंबई १००० आणि अभिजित एमएडीसी नागपूर एनर्जी प्रायव्हेट  लिमिटेडमध्ये ३० जणांना नोकरी देण्यात आली आहे.

नॉन-सेझमधील रोजगार

टीसीआय इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ५००, कॉन्कोर ५१०, महिद्रा बेबॅन्को डेव्हलपर्स लिमिटेड ३००, मोराज फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ३००, मोराज इन्फ्राटेक इंटरनॅशनल लिमिटेड ८० आणि डी.वाय. पाटील एज्युकेशनल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ८० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.