‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु‘ च्या प्राथमिक फेरीला फक्त दोन दिवस उरले

नागपूर : महाराष्ट्राच्या वक्तृत्वकलेचा वारसा जोपासणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु‘ ला विदर्भातील विद्यार्थ्यांनी दिलेला कौल वाखाणण्याजोगा आहे.  नागपूरची प्राथमिक  फे री २ व ३ मार्चला होणार आहे. सोमवारी सकोळी ९.३० वाजता विनोबा विचार कें द्रात स्पर्धेला सुरु वात होणार आहे.

विदर्भाच्या  महाविद्यालयातील हौशी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला असून इच्छुकोंना ऐनवेळीही प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, स्पर्धकोंना स्पर्धेच्या अटींचे पालन क रणे अगत्याचे राहील. स्पर्धेत १६ ते २४ वयोगटातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता येईल. प्राथमिक  फे रीसाठी ‘निर्भया आणि नंतर’, ‘जंगलाच्या शोधात वाघोबा’, ‘स्वच्छ भारत : एक दिवास्वप्न’, ‘ज्यांचे त्यांचे गांधी आणि सावरकर’ आणि ‘ऑलिम्पिक वर्षांत क्रिकेटची चिंता’ या राजकीय, सामाजिक, क्रीडा, पर्यावरण अशा  विषयांवर विद्यार्थी वक्तृ त्वाची मोहर उमटवणार आहेत. प्राथमिक फेरीमधून जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांची ७ मार्च रोजी होणाऱ्या नागपूर विभागीय अंतिम फेरीसाठी निवड होणार आहे. त्या फेरीतील विजेता महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. साहित्य आणि संस्कृ तीची विकासात महत्त्वाची भूमिका आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी ही संस्कृ ती व परंपरा टिक वून ठेवण्यासाठी क रीत असलेल्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी समाजातील जाणकारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोक सत्ता’च्यावतीने क रण्यात येत आहे.

प्रायोजक..

वीणा वर्ल्ड प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ ही स्पर्धा राज्यातील आठ विभागीय केंद्रांवर होणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड’ असून या स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च हे आहेत.