News Flash

‘विदर्भरंग’मध्ये यंदा समाजसेवी दाम्पत्यांच्या सांसारिक प्रवासाचे चित्रण

लवकरच वाचकांपर्यंत पोहोचणार

लवकरच वाचकांपर्यंत पोहोचणार

नागपूर : ‘लोकसत्ता’चा ‘विदर्भरंग’ हा दिवाळी अंक लवकरच वाचकांपर्यंत पोहोचणार असून यंदा समाजसेवी दाम्पत्यांच्या सांसारिक प्रवासाचे कथन हे अंकाचे वैशिष्ट आहे.

स्वत:च्या आयुष्याशी तडजोड करून समाजात बदल घडवू पाहणाऱ्या दाम्पत्यांना त्यांच्या सांसारिक प्रवासात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, समाजासाठी झटताना त्यांच्या संसारात काय अधिक-उणे राहिले, नात्यातील भावनिक वादळे त्यांनी कशी थोपवून धरली, आर्थिक ओढाताणीवर कशी मात केली, या सर्वाची उत्तरे या अंकात ही दाम्पत्ये स्वत:च देणार आहेत.

यामध्ये आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढणारे बंडय़ा साने-पौर्णिमा उपाध्याय, निष्प्राण देह पाण्याबाहेर काढणारे जगदीश खरे-जयश्री खरे, धरणग्रस्त व असंघटित कामगारांसाठी झटणारे विलास भोंगाडे-सुजाता भोंगाडे, झोपडपट्टीत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणारे खुशाल ढाक-उषा ढाक, गरिबांना आरोग्यसेवा देणारे डॉ. विराज गीते-डॉ. नम्रता कपुरे, वंचित आणि महिलांच्या विकासासाठी धडपडणारे अमोल मानकर-जयश्री मानकर, स्वामिनी जनआंदोलनाचे प्रणेते महेश पवार-योगिता पवार, अनाथांचे पालक झालेले सविता भुरले-धनेंद्र भुरले, वारांगणाच्या अस्मितेसाठी भांडणारे ईसो डॅनियल-लीला ईसो, बेघर आणि मतिमंदांचा आधार ठरलेले नंदकु मार पालवे-आरती पालवे, आदिवासी गावात विकासात्मक परिवर्तन घडवणारे अविनाश पोईनकर-वर्षां कोडापे, गांधीविचार समाजात रुजवणारे प्रा. अतुल शर्मा-सुषमा शर्मा यांनी स्वत:च्या आयुष्याशी तडजोड करून समाजाला दाखवलेल्या प्रकाशवाटेची ओळख या अंकातून करून देण्यात आली आहे.

आपल्या विधायक कृतीतून समाज बदलवू पाहणाऱ्या या दाम्पत्यांच्या संसारकथा अवघ्या समाजासाठीच प्रेरक आहेत. विदर्भरंग दिवाळी अंकातून त्या लवकरच वाचकांसमोर येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2020 12:36 am

Web Title: loksatta vidarbha rang 2020 diwali issue release zws 70
Next Stories
1 भाजपच्या बैठकीला सोले अनुपस्थित
2 Coronavirus : करोनाच्या उद्रेकानंतर प्रथमच केवळ चार मृत्यू
3 दंडाची रक्कम, पोलीस बंदोबस्तातही वाढ!
Just Now!
X