महादेवराव जानकर यांची टीका

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा भाजप प्रवेश सुरू आहे. हा ओघ असाच सुरू राहिल्यास भविष्यात भाजपचाही काँग्रेस होण्याची शक्यता आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा

पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी शनिवारी नागपूरच्या संताजी सांस्कृतिक सभागृहात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. जानकर म्हणाले, सध्या विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही असे मत व्यक्त केले. राज्यात रासपची ताकद वाढत आहे. सध्या रासपचे राज्यात ९८ जिल्हा परिषद सदस्य, ४ नगराध्यक्ष, ३ सभापती, ६ उपनगराध्यक्ष, २ आमदार आहेत. त्यामुळे पक्षाने भाजपकडे ५७ जागांची मागणी केली आहे. त्यात नागपूर जिल्ह्य़ातील सावनेरसह विदर्भातील प्रत्येक जिल्हय़ातून एका जागेचा समावेश असल्याचे जानकर यांनी सांगितले.

मुंबईच्या मेळाव्यात शक्तिप्रदर्शन

२५ ऑगस्टला मुंबईत रासपचा वर्धापन दिन आहे. त्यात सुमारे १० लाख कार्यकर्ते सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली.