News Flash

गणेशोत्सवानिमित्त १५०० किलोंचा महाप्रसाद करणार

वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून विक्रम करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १७ सप्टेंबरला विष्णू जी की रसोईमध्ये गणेशोत्सवानिमित्त १५०० किलो मसाले भात मोठय़ा कढईमध्ये तयार करणार

गणेशोत्सवानिमित्त १५०० किलोंचा महाप्रसाद करणार

विष्णू मनोहर यांचा नवीन संकल्प

नागपूर : वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून विक्रम करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १७ सप्टेंबरला विष्णू जी की रसोईमध्ये गणेशोत्सवानिमित्त १५०० किलो मसाले भात मोठय़ा कढईमध्ये तयार करणार आहेत. खवय्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारे विष्णू मनोहर यांनी यापूर्वी पाच हजार किलो खिचडी, अकराशे किलो साबुदाणा खिचडी, ४ हजार ५०० किलोंचे वांग्याचे भरीत आदी विक्रम केले आहेत. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने सात बाय सात आकाराच्या कढईचा उपयोग करत १५०० किलोंचा मसाले भात  तयार करणार आहेत. १७ सप्टेंबरला सकाळी ५.३० वाजता हा उपक्रम सुरू होणार असून यासाठी २५ पेक्षा अधिक लोक मदतीला राहणार आहेत. सकाळी ८ नंतर या महाप्रसादाचे वितरण होईल. नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी महाप्रसाद वितरणासाठी १५ कक्ष राहणार आहेत. मसाले भात तयार करण्यासाठी १ हजार किलो तांदळाचा उपयोग करणार आहे. खवय्यांनी येत्या शुक्रवारी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विष्णू जी की रसोई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2021 12:37 am

Web Title: mahaprasad 1500 kg performed occasion ganeshotsav ssh 93
Next Stories
1 विवेकाचे ‘विसर्जन’!
2 ‘दहशतवादी सापडणे ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा’
3 सिरो सर्वेक्षणाचा मुहूर्त लांबणीवरच!
Just Now!
X