News Flash

मृत्यूसंख्येने पुन्हा शतक ओलांडले!

२४ तासांत १०१ मृ्त्यू; नवीन ६,२८७ रुग्ण

२४ तासांत १०१ मृ्त्यू; नवीन ६,२८७ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात सलग चार दिवस करोना मृत्यूंची संख्या नव्वदहून कमी असतानाच मंगळवारी पाचव्या दिवशी पुन्हा करोना बळींच्या संख्येने शतक ओलांडले. २४ तासांत जिल्ह्य़ात १०१  रुग्णांचा मृत्यू तर ६ हजार २८७ नवीन रुग्णांची भर पडली.

नागपूर शहरात २३ एप्रिल २०२१ रोजी ५८, ग्रामीणला ४५, जिल्ह्य़ाबाहेरील ७ अशा एकूण जिल्ह्य़ात ११० रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २३ एप्रिलला ८२ रुग्णांचा मृत्यू, २४ एप्रिलला ८२, २५ एप्रिलला ८७, २६ एप्रिलला ८९ रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला. त्यामुळे जिल्ह्य़ात मृत्यू कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत असतानाच मंगळवारी पुन्हा २४ तासांत शहरात ५४, ग्रामीण ३९, जिल्ह्य़ाबाहेरील ८ असे एकूण १०१ मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोना मृत्यूंची संख्या ४ हजार ३५५, ग्रामीण १ हजार ७४३, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २८ अशी एकूण ७ हजार १२६ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ३ हजार ८१३, ग्रामीण २ हजार ४६६, जिल्ह्य़ाबाहेरील ८ अशा एकूण जिल्ह्य़ात ६ हजार २८७ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ८१ हजार ४२८, ग्रामीण १ लाख ३ हजार ६८९, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २१० अशी एकूण ३ लाख ८६ हजार ३२७ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात १७ हजार १२३, ग्रामीण ५ हजार ७८५ असे एकूण २२ हजार ९०८ व्यक्तींनी चाचणीसाठी नमुने दिले. त्यांचा अहवाल बुधवारी येणे अपेक्षित आहे. परंतु सोमवारी तपासलेल्या १८ हजार ९९७ नमुन्यांमध्ये ६ हजार २८७ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाल्याने सकारात्मक अहवालाचे प्रमाण ३३.०९ टक्के नोंदवले गेले.

नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त अधिक

शहरात दिवसभरात ४ हजार ४८८, ग्रामीणला २ हजार ३७५ असे एकूण ६ हजार ८६३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ३० हजार ६१०, ग्रामीण ७१ हजार ८७० अशी एकूण ३ लाख २ हजार ४८० व्यक्तींवर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात २१ एप्रिल २०२१ रोजी दैनिक करोनाग्रस्ताहून (७,२२९ रुग्ण) करोनामुक्तांची (७,२६६ व्यक्ती) संख्या आढळली होती. त्यानंतर सहा दिवसांनी येथे पुन्हा २४ तासांत आढळलेल्या नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक नोंदवले गेले.

विदर्भात २५३ मृत्यू; नवीन १५,०५२ रुग्ण

विदर्भाच्या अकरा जिल्ह्य़ात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी २४ तासांत आढळणारी करोना  रुग्णांची मृत्यूसंख्या घटली असली तरी नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली आहे. येथे दिवसभरात २५३ करोनाग्रस्तांचा मृत्यू तर १५ हजार ५२ नवीन रुग्णांची भर पडली.

विदर्भात २६ एप्रिलला २७४ करोनाग्रस्तांचा मृत्यू तर १३ हजार ६०० नवीन रुग्ण आढळले होते. परंतु मंगळवारी मृत्यूसंख्या कमी होऊन २५३ नोंदवली गेली. १५ हजार ५२ नवीन रुग्ण नोंदवले गेले. नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ५४, ग्रामीण ३९, जिल्ह्य़ाबाहेरील ८, असे एकूण १०१ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३९.९२ टक्के मृत्यूचा समावेश आहे. तर नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत ६ हजार २८७ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात १७ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार २२७ रुग्ण, अमरावतीत ८ मृत्यू तर ८३८ नवीन रुग्ण, चंद्रपूरला १७ मृत्यू तर १ हजार ३११ रुग्ण, गडचिरोलीत १६ मृत्यू तर ५५८ रुग्ण, गोंदियात १२ मृत्यू तर ५५५ रुग्ण, यवतमाळला २५ मृत्यू तर १ हजार रुग्ण, वाशीमला ४ मृत्यू तर ४९८ रुग्ण, अकोल्यात १० मृत्यू तर ५०० रुग्ण, बुलढाण्यात ९ मृत्यू तर १ हजार ३२७ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात ३४ मृत्यू तर ९५१ नवीन रुग्ण आढळले.

६०.१८ टक्के सक्रिय रुग्ण शहरातील

शहरात ४६ हजार १७२ (६०.१८ टक्के), ग्रामीणला ३० हजार ५४९ (३९.८२ टक्के) असे एकूण जिल्ह्य़ात ७६ हजार ७२१ सक्रिय  करोनाग्रस्त आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ८ हजार ९३५ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये  तर ६७ हजार ७८६ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

लसीकरण आढावा

पहिली मात्रा

आरोग्य सेवक       – ४२५५९

फ्रंट लाईन वर्कर      – ४३७१६

४५ अधिक  वयोगट    –  ९४०८९

४५ अधिक कोमार्बिड     – ७३५१४

६० अधिक सर्व नागरिक – १,५६,५५२

एकूण  –      ४,१०,४७०

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक           – १८९६१

फ्रंट लाईन वर्कर       –  ११४६७

४५ अधिक वयोगट      – ६८०६

४५ अधिक कोमार्बिड    –  ७११५

६० अधिक सर्व नागरिक   –  ३०६४०

एकूण –    ७४९८९

संपूर्ण लसीकरण एकूण –  ४,८५,४५९

खाटांची उपलब्धता

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालये मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहेत याची माहिती  www.nmcnagpur.gov.in व http://nsscdcl.org/covidbeds वर  तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आय.सी.यू. प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत प्राणवायू खाटा ३९ आणि प्राणवायू नसलेल्या खाटा ३० उपलब्ध होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:35 am

Web Title: maharashtra s nagpur district reports 6 287 new covid19 cases zws 70
Next Stories
1 वडेट्टीवार यांच्याकडून टाळेबंदी वाढण्याचे संकेत
2 तीन लाकूड गिरण्यांना आग
3 सफेलकरच्या ‘राजमहाल’वर बुलडोझर चालणार
Just Now!
X