खिंडसीच्या रिसॉर्टमध्ये देहव्यापार उघडकीस, कंत्राटदाराकडे साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या रिसॉर्टची जबाबदारी

शेजारच्या राज्यातील पर्यटन महामंडळ पर्यटनाच्या क्षेत्रात नवनवे आयाम रचून राज्याची प्रतिमा उंचावत असताना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये शरमेने मान खाली घालायला लागावे, असे कृत्य उघडकीस आल्याने राज्याची प्रतिमा मात्र डागाळली आहे.

Devendra Fadnavis, Asserts Victory, Victory of mahayuti, mahayuti Victory India's Progress, Yavatmal Washim Campaign, Yavatmal Washim lok sabha seat, lok sabha 2024, election 2024,
“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Assistant police officers son succeeds in UPSC examination
पिंपरी : सहायक फौजदाराच्या मुलाची ‘यूपीएससी’ परीक्षेत यशाला गवसणी
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर

रामटेकजवळील खिंडसीच्या ‘हॉटेल ग्रीन लँड’ मध्ये अलीकडेच उपराजधानीतील वारांगनांना देहव्यापार करताना रामटेक पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या रिसॉर्टच्या कंत्राटदाराकडेच पर्यटन व साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या रिसॉर्टची जबाबदारी सोपवण्यात आल्याने महामंडळाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पर्यटन विकास महामंडळाच्या एकूणच कारभारावर पर्यटक आणि विभागीय आयुक्तांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. प्रामुख्याने रिसॉर्टची स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक यावर त्यांनी बोट ठेवले होते. उपराजधानीत नुकतीच मध्यप्रदेश व छत्तीसगड पर्यटन विकास महामंडळाची चमू येऊन गेला. राज्यातील पर्यटनाचा दर्जा उंचावण्याची कळकळ त्यांच्या सादरीकरणातून दिसून आली. अशापद्धतीचे सादरीकरण इतर राज्यात जाऊन पर्यटन विकासाला प्रोत्साहन देणे तर दूरच. पण, आहे त्या ठिकाणचे व्यवस्थापन सांभाळणेही महामंडळाला कठीण जात आहे. रामटेकजवळील      खिंडसी येथे इतरही खासगी रिसॉर्ट आहेत आणि त्याठिकाणी महाविद्यालयीन युवक-युवतींचे चाळे चालतात हे सर्वानाच ठाऊक आहे. सर्वसामान्य पर्यटकांसाठी येथे काहीच व्यवस्था नाही. या खासगी रिसॉर्टवरसुद्धा अनेकदा छापे घातले गेले, पण अजूनही तेथे अवैध प्रकार सुरूच आहेत.

पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये त्याहूनही मोठा प्रकार उघडकीस आला असून येथे उपराजधानीतील ‘गंगाजमूना’ या वेश्यावस्तीतील वारांगनांसोबत ग्राहकांना पकडण्यात आले. या प्रकरणी रिसॉर्टच्या कंत्राटदाराची साधी चौकशीही महामंडळ करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मोठी रक्कम मोजून काहींनी हे रिसॉर्ट चालवायला घेतले आहे. या कंत्राटदारावर काही गुन्हे दाखल असून त्याच्याच हातात पर्यटन व साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या रिसॉर्टची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळ डोळेझाक करुन कारभार करत असण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. देहव्यापाराच्या या प्रकरणात अनैतिक देहव्यापार कायदा(पीटा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि पीटामध्ये मालकावरही गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. या रिसॉर्टची मालकी ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे आहे. सध्या तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरीही महामंडळाची प्रतिमा मात्र डागाळली गेली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विभागीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांना विचारले असताना त्यांनी अजूनपर्यंत अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही असे सांगितले.

पर्यटनमंत्र्यांकडून गंभीर दखल

यासंदर्भात राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना विचारणा केली असता त्यांनीही हा प्रकार धक्कादायक असल्याचे सांगितले. तक्रारी होत्या तर त्या गांभीर्याने कां घेण्यात आल्या नाहीत. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यात कुणाचीही गय केली जाणार नाही. मग तो विभागीय व्यवस्थापक असला तरीही दोषी आढळणाऱ्या प्रत्येकाला निलंबित केले जाईल, असे रावल यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.