News Flash

ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकाराचे धडे! 

चित्रफितींचा समाज माध्यमांवर सुळसुळाट; गैरप्रकार रोखण्यासंदर्भात विद्यापीठाकडे धोरण नाही

(संग्रहित छायाचित्र)

चित्रफितींचा समाज माध्यमांवर सुळसुळाट; गैरप्रकार रोखण्यासंदर्भात विद्यापीठाकडे धोरण नाही

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची हिवाळी परीक्षा अंतिम टप्प्यात आली आहे. याशिवाय उन्हाळी परीक्षा २९ जूनपासून सुरू होत असून करोनामुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होत असल्याचा दावा केला आहे. मात्र, यूटय़ुब व समाज माध्यमांवर ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार कसा करायचा, याचे धडे देणाऱ्या अनेक चित्रफिती आहेत. विशेष म्हणजे,नागपूर विद्यापीठाने अद्याप अशा प्रकारच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही किंवा धोरणही तयार केलेले नाही.

विद्यापीठाची एक तासाची ऑनलाईन परीक्षा असते. विद्यार्थ्यांना घरी बसून ही परीक्षा द्यावी लागते. विद्यापीठाने यासाठी ‘वेब’ आधारित संकेतस्थळ तयार केले आहे. ज्यामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे संकेतस्थळ सुरू असताना मोबाईल लोकेशन सुरू ठेवावे लागेल. यामुळे विद्यार्थी एकाच ठिकाणावरून परीक्षा देत असेल तर गैरप्रकार होण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जातो. याशिवाय लॉगिनसाठी विद्यार्थ्यांना फोन कॅमेरा आणि माईक चालू ठेवावा लागतो.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींची नोंद केली जात असल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. मात्र, समाज माध्यमांवर परीक्षेत गैरप्रकार कसे करावे याचे धडे देणाऱ्या चित्रफितींचे कुणी अनुकरण केलेच तर त्यावर आळा घालणारी कुठलीही यंत्रणा मात्र विद्यापीठाकडे नाही.

परीक्षांसंदर्भात जर कोणी अशाप्रकारे विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत असेल तर ते चुकीचे आहे. विद्यापीठ अशा व्यक्तींवर कारवाई करेल. याशिवाय अशा अनियमिततेस सामोरे जाण्यासाठी एक योग्य धोरणही तयार केले जाईल.

-डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:16 am

Web Title: malpractice in online exams of nagpur university zws 70
Next Stories
1 Coronavirus : रुग्णालयांत दाखल रुग्णसंख्या पाचशेहून कमी
2 महापालिकेत औषधांचा कोटय़वधींचा गैरव्यवहार
3 दोन महिन्यांत रस्त्यांवर दोन हजारांवर खड्डे
Just Now!
X