27 September 2020

News Flash

पोलिसाच्या अंगावर वाहन चढवून खुनाचा प्रयत्न

संशयास्पद वाहन रोखणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चढवून खून करण्याचा प्रयत्न केला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नागपूर : संशयास्पद वाहन रोखणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चढवून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शफीनगर पुलियाजवळ गुरुवारी रात्री सव्वातीनच्या सुमारास घडली.

गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गजा हे एका कर्मचाऱ्यासह हजारी पहाड परिसरात रात्र गस्तीवर होते. त्यावेळी एमएच २४ सी, १६५६ क्रमांकाची तवेरा कार संशयास्पदरित्या फिरताना दिसली. कारचालक पोलिसांना बघून पळू लागला. त्यामुळे पोलीस पाठलाग करू लागले. कार ही प्रथम एका झोपडपट्टीत अडकली. त्यावेळी पोलिसांच्या अंगावर वाहन चढवले व ते पळून गेले. त्यानंतरही गिट्टीखदान पोलिसांनी पाठलाग  केला. कार ही काटोल रस्त्याने मानकापूरकडे जात होती. गिट्टीखदान पोलिसांनी मानकापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शफीनगर पुलियाजवळ हवालदार गजानन वाघ आणि चंद्रकांत यादव यांनी कारला अडवण्याचा प्रयत्न केला. कारचालकाने त्यांनाही उडवले असता एक शिपाई जखमी झाला. त्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारचा पाठलाग सुरू ठेवला.

मात्र, उड्डाणपुलाजवळ ट्रक व बस अचानक थांबल्याने पोलिसांच्या वाहनांना अपघात होऊन ते जखमी झाले व कारमधील लोक गाडी सोडून पळून गेले. ही कार जरीपटका पोलिसांनी ताब्यात घेतली. कारचालकाविरुद्ध  खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:40 am

Web Title: man attempt to murder policeman by hitting car
Next Stories
1 वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी किती दिवस?
2 विमानतळ विकासाची संधी कोणाला ?
3 हुक्का पार्लर चालकांचा आता ग्रामीण भागाकडे मोर्चा
Just Now!
X