News Flash

पाच जणांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून उद्भवलेल्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नागपुरातील घटना : अनैतिक संबंधांतून कृत्य

नागपूर : कौटुंबिक कलहामुळे एका क्रूरकम्र्याने पत्नी व दोन मुलांसह पाच जणांचा खून करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून उद्भवलेल्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विजया आलोक माथुरकर (३२), परी ऊर्फ बिंटी आलोक माथुरकर (९), साहिल आलोक माथुरकर (७), लक्ष्मी देवीदास बोबडे आणि अमिषा देवीदास बोबडे (सर्व रा. बागल आखाडा परिसर, गोळीबार चौक) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. आलोक अशोक माथुरकर (३६) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आलोकचा विजयाशी तेरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. त्याला एक मुलगी व मुलगा होता. लग्नानंतर आलोक आपल्या कुटुंबासह अमरावती येथे राहायचा. पण व्यवसाय बुडाल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी तो नागपुरात परतला व त्याने सासरे देवीदास बोबडे व त्याचे कुटुंबीय राहात असलेल्या परिसरात भाडय़ाने घर घेतले. त्याच ठिकाणी एका खोलीत तो कपडे शिवायचा. सासरे देवीदास बोबडे हे मेयो परिसरातील चंद्रलोक इमारतीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात तर सासू लक्ष्मी या कॅटरिंगमध्ये स्वयंपाकाचे काम करायच्या. मेहुणी अमिषा बारावी नापास होती व ती आलोकच्या कपडे शिवण्याच्या व्यवसायातच बहिणीला मदत करायची. पुढे तिचे व आलोकचे अनैतिक संबंध निर्माण झाले. याबाबत त्याची सासू व पत्नीला समजल्यानंतर दोन्ही कुटुंबांत वाद सुरू होते.

दुसरीकडे अमिषाने इतर तरुणांशी बोलूही नये, यासाठी आलोक दबाव आणायचा. तिला आपल्या एका मित्राशी बोलताना पाहून २५ एप्रिल २०२१ला आलोकने अमिषाला मारहाण केली होती. त्याची तक्रार तिने पोलिसांत दिली. तेव्हापासून अमिषा आरोपीशी बोलत नव्हती. त्यामुळे तो संतापला होता. तिच्यासोबतचे संबंध पूर्ववत करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. रविवारी रात्री सासू झोपली असताना तो अमिषाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिने आपल्या बहिणीला फोन करून याबाबत माहिती दिली. आलोक घरी परत येताच पत्नीशी त्याचे भांडण झाले. या भांडणातून त्याने प्रथम चाकूने गळा कापून तिचा खून केला. त्यानंतर मुलीचे हातपाय बांधले व तिचाही गळा कापला. मुलगा झोपेत असताना त्याचा गळा आवळून खून केला. तेथून बाहेर पडल्यानंतर तो जवळच राहणाऱ्या सासूच्या घरी पोहोचला व झोपेत असताना सासू व मेहुणीचा गळा कापला.

हत्या केल्यानंतर मेहुणीवर बलात्कार!

आलोकने मेहुणीचा गळा चिरून तिचा खून केला. त्यानंतर त्याने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमिषाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. पत्नी विजयाचा मृतदेहही अर्धनग्न अवस्थेत होता. सर्वाचा खून केल्यानंतर सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या दरम्यान आलोकने आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास त्याला फिरताना एकाने बघितले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 3:08 am

Web Title: man kills 5 members of his family dies by suicide in nagpur zws 70
Next Stories
1 शाळांकडून बारावीचा नमुना निकाल तयार
2 अर्थसाहाय्याच्या निधीतून बँकांनी इतर शुल्क कापू नये!
3 तक्रार निवारण कक्षाने कारवाई न केल्यास आयोगाकडे जाण्याचा पर्याय – न्यायालय
Just Now!
X