02 March 2021

News Flash

वीज बिलाने घेतला जीव… ४० हजार बील पाहून ग्राहकाची आत्महत्या

जास्त वीज बिल आल्यामुळे तणावात

प्रतिनिधिक छायाचित्र

जास्तीच्या वीज बिलाच्या शॉकमुळे नागपुरातील एका ५७ वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाधर लक्ष्मण गैधाने हा ५७ वर्षीय व्यक्ती नागपुरातील यशोधरा नगरमध्ये राहत होता. लीलाधर तळमजल्यावर तर भाडेकरू पहिल्या मजल्यावर राहतात. गेल्या आठवड्यात लीलाधर यांना तब्बल ४० हजार रुपयांचं वीज बिल आलं होतं. इतकं वीज बिल आल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासूनच लीलाधर मानसिक तणावाखाली होता.

लीलाधर गौधाने यांनी तणावाखाली अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेहलं मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना सांगितलं की, गेल्या आठवड्यात ४० हजार वीज बिल आल्यामुळे लीलाधर जास्त दारु प्राशन करु लागले होते. शनिवारी दुपारी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात अनेकांना वाढीव वीज बिल आले आहे. कलाकारांनी ट्विट करत याबाबतची नाराजीही व्यक्त केली होती. भाजपानं तर वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन छेडलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 9:37 am

Web Title: man shocked after getting rs 40000 electricity bill dies by suicide in maharashtra nck 90
Next Stories
1 उपराजधानीतील गुन्हयांमध्ये १३०५ ने घट
2 कुलगुरूपदी डॉ. सुभाष चौधरी यांची निवड
3 प्रकल्पासाठी वाघांचे स्थलांतर अयोग्य!
Just Now!
X