नागपूर : एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार करून अश्लील चित्रफित तयार केली व ती नातेवाईकांच्या व्हॉट्स अ‍ॅप समूहावर प्रसिद्ध केली. याप्रकरणी नराधमाविरुद्ध रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पांडुरंग हरिश्चंद्र पारगावे (३३) रा. भालकी, लातूर असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला मूळची लातूर येथील रहिवासी आहे. आरोपीचे तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, तिचा विवाह भंडारा जिल्ह्य़ातील व्यक्तीशी झाला. विवाहापूर्वी तिची तयार केलेली अश्लील चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन आरोपींनी रामटेक येथील लॉजवर  तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिने नकार दिला असता त्याने तिच्या नातेवाईकांचे एक व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करून अश्लील चित्रफित प्रसिद्ध केली. तिचा मुलगा व वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भंडरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो गुन्हा रामटेक पोलिसांकडे वर्ग केला.