30 October 2020

News Flash

लोकसत्ताचे मंगेश राऊत यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात.

मंगेश दादाजी राऊत

नागपूर : लोकसत्ताचे खास प्रतिनिधी मंगेश दादाजी राऊत यांना महाराष्ट्र सरकारचा नागपूर विभागासाठीचा ग.त्र्यं. माडखोलकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. बुधवारी राज्य सरकारने २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांतील पुरस्कार जाहीर केले.  २०१६ या वर्षांसाठीचा  नागपूर विभागाचा ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार लोकसत्ताचे खास प्रतिनिधी मंगेश दादाजी राऊत यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ५१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगेश राऊत यांची ‘सडक्या सुपारीची तस्करी’ ही वृत्तमालिका विशेष गाजली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 1:01 am

Web Title: mangesh raut of loksatta received excellent journalism award
Next Stories
1 नागपूरकर उदयन पाठक यांना ‘एफएएसएम’ पुरस्कार जाहीर
2 एक कोटीसाठी तरुणाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद
3 प्राकृत शिलालेख साहित्यावर व्याख्यान
Just Now!
X