05 March 2021

News Flash

‘व्हीएनआयटी’ दुर्लक्षित; रिक्त पदांचे ग्रहण

महत्त्वाची पदेही प्रभारींच्या भरोसे

महत्त्वाची पदेही प्रभारींच्या भरोसे

नागपूर : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (व्हीएनआयटी) कुलसचिवांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीनुसार संस्थेच्या मान्यताप्राप्त असलेल्या ७०४ जागांपैकी जवळपास ४३ टक्के म्हणजे २९९ जागा रिक्त असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या नामांकित संस्थेकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी संस्थेकडून उत्कृष्ट प्राध्यापकांची निवड करणे अपेक्षित असते. मात्र, प्रोफेसर, सहयोग आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या ३३५ जागांपैकी २३९ जागा भरण्यात आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या ९६ जागा रिक्त असल्याचे समोर आले. त्या जागांचा अतिरिक्त भार विभागातील इतर प्राध्यापकांवर देण्यात आलेला आहे. ३३ अधिकाऱ्यांपैकी १९ जागा भरण्यात आल्या आहेत.

तांत्रिक जागांचा विचार केल्यास १०१ वरिष्ठ तर १०० कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या जागांवर ३३ आणि ३६ इतकीच पदे भरण्यात आल्याचे दिसते. अशीच परिस्थिती त्याखालील पदांचीही आहे. व्हीनआयटी हे के वळ उपराजधानीचे नव्हे तर देशाचे वैभव आहे. त्यामुळे अशा नामांकित संस्थेमध्ये असलेल्या रिक्त पदांमुळे येथील कर्मचाऱ्यांवर प्रचंड तणाव असून प्राध्यापकांना अतिरिक्त प्रभार घेऊन कामे करावे लागत असल्याचे वास्तव आहे.

राष्ट्रीय मानांकनात झेप

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाद्वारे दरवर्षी देशातील शैक्षणिक संस्थांना मानांकन देण्यात येते. यामध्ये व्हीएनआयटीचे मानांकन सुधारले आहे. २०१६ साली संस्थेचे मानांकन १८ होते. तर तर २०१९ ला ते ३१ व्या क्रमांकावरून २०२० ला २७ व्या क्रमांकावर आले आहे. मानांकनात काहीसी घट होण्यामागे रिक्त पदांचे कारण असल्याचे बोलले जाते.

८६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’

व्हीएनआयटीमधील विद्यार्थ्यांचे दरवर्षी देश-विदेशातील नामांकित कं पनीमध्ये प्लेसमेंट होते. यावर्षी संस्थेत १३० कंपन्यांनी भेट देऊन ५२१ विद्यार्थ्यांपैकी ४४९ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली. त्याचे प्रमाण ८६ टक्के आहे. यात एका विद्यार्थ्यांला ३८.२१ लाखांचे सर्वाधिक वार्षिक पॅकेज देण्याल आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:41 am

Web Title: many important posts including registrar post vacant in vnit zws 70
Next Stories
1 ‘लॉगिन’ केल्यावर संदेश येतो, ‘आता कुठलाही पेपर नाही’!
2 ‘प्रधानमंत्री आवास’मध्येही राज्याची अडवणूक
3 उत्तर-पश्चिम घाटात काटेचेंडू वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध
Just Now!
X