•  बाजारपेठा तुडुंब, हॉटेलातही रांगा

  •   बसस्थानक, उद्याने पुन्हा गजबजली

  •   रस्त्यांवर वाहनांची ‘स्पर्धा’

नागपूर : टाळेबंदीमुळे लादलेले निर्बंध हटताच सोमवारी पहिल्याच दिवशी शहरात गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. शहरातील सर्व मोठय़ा बाजारपेठा तुडुंब भरल्या होत्या, तर  रस्त्यांवरही वाहनांची जुनीच ‘स्पर्धा’ नव्याने रंगत होती. आतापर्यंत एखाद-दुसऱ्या प्रवाशाची पायधूळ लागणारी शहर बसस्थानके व राज्य परिवहन विभागाचे केंद्रीय बसस्थानकही आज प्रवाशांनी गजबजले होते. उद्याने, खेळाची मैदानेही लोकांच्या गर्दीने व्यापून गेली होती. परंतु, उत्साहाच्या भरात अनेकांकडून करोना नियमावलीचे उल्लंघन होत होते. विशेष म्हणजे, असे उल्लंघन करणाऱ्यांना आवरणारी यंत्रणा कुठेच सक्रिय दिसत नव्हती.

बर्डी, सदर, इतवारी, गांधीबाग, महालच्या बाजारात तसेच दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. हॉटेलात बसून जेवण्याचा आनंद लुटणारेही अनेक होते.  विशेष म्हणजे,  दुकाने सुरू ठेवण्याची वेळ दोनवरून पाच करण्यात अल्याने व्यापाऱ्यांनी देखील सकाळी दहा, अकराच्या सुमारास दुकाने उघडली. दुपारी ११ नंतर बर्डी, सदर, इतवारी, गांधीबाग, महाल आदी बाजारपेठांसोबतच मॉलमध्येही गर्दी वाढली. सरकारचे वेळ  वाढवून दिल्याबद्दल व्यापऱ्यांनी आभार मानले.

मदानांवर खेळाडूंचा सराव

अनेक दिवसांपासून खेळाची मदाने, उद्याने बंद  होती. ती उघडताच शहरातील सर्व मदानांवर विविध प्रकारच्या खेळाचा सराव करताना मुले दिसून आलीत. रेशीमबाग, मोतीबाग, रामनगर, क्रीडासंकुल, आंबडेकर कॉलेज मदानाह शहरातील उद्यानांमध्येही सकाळच्यावेळी नागरिक फिरताना दिसले.