19 September 2020

News Flash

पोलीस आयुक्तांकडून बाजारपेठांची पाहणी

शहरात दररोज करोनाचे दोन हजारांवर रुग्ण सापडत आहेत. रुग्णालयांमध्ये  खाटा उपलब्ध नाहीत.

इतवारी बाजारपेठेत दुकानदारांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार.

नागपूर : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी अचानक शहरातील इतवारी व सीताबर्डी परिसराला भेट देऊन बाजारपेठांमधील गर्दी आणि लोकांकडून नियमांचे पालन करण्यात येते की नाही, याची पाहणी केली. शहरात दररोज करोनाचे दोन हजारांवर रुग्ण सापडत आहेत. रुग्णालयांमध्ये  खाटा उपलब्ध नाहीत. या परिस्थिती लोकांनी घरी सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. घराबाहेर पडायचे असल्यास मुखपट्टी आणि सामाजिक अंतराचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. पण, लोकांकडून नियमांचे पालन करण्यात येत नाही. मुखपट्टी न घालणाऱ्यांविरुद्ध दररोज पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अमितेशकुमार यांनी  बाजारपेठ आणि तेथील व्यवस्थेची पाहणी करण्याचा निर्णय घेतला, सोमवारी सकाळी  त्यांनी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतवारी परिसरात शहीद चौक, जागनाथ बुधवारी, तीन नल चौक, टांगा स्टॅण्ड आणि नंगा पुतळा परिसरात भेट दिली.  येथील व्यावसायिकांशी चर्चा करून करोनासंबंधित नियमांचे पालन करण्यात येत आहे किंवा नाही, याबद्दल माहिती घेतली. विना मुखपट्टी येणाऱ्या ग्राहकास दुकानात प्रवेश देऊ नये, असे आवाहन त्यांनी दुकानदारांना केले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या विनंतीवरून त्यांनी तहसील पोलीस ठाण्याला भेट दिली. नागपुरात पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी भेट प्रथमच शहरातील कोणत्या पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी पोलीस ठाणे व ठाणेदारांच्या कामावर समाधान व्यक्त केले. दुपारी १२.३० वाजता सीताबर्डी बाजारपेठेला भेट दिली.

या ठिकाणी त्यांनी मोदी गल्ली क्रमांक २ आणि ३ मधील व्यापाऱ्यांशी संवाद साधला.  पदपथावर दुकान लावलेल्या फेरीवाल्यांना नियमांचे पालन करण्यास सांगितले. तसेच दोन दुकानदारांनी नियमांचे  पालन न केल्याने त्यांना पाच हजारांचा दंडही ठोठावला. तसेच मुखपट्टी न घालणारे व नियमांचे पालन न करणाऱ्या ४० लोकांवर या भेटीदरम्यान कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांसह अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विक्रम साळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 1:13 am

Web Title: market inspection by the nagpur police commissioner zws 70
Next Stories
1 तांडय़ांवरील मुलांच्या शिक्षणाचा पेच
2 पाच हजारांहून अधिक प्राण्यांकडून ‘अंडरपास’चा वापर 
3 मराठा आरक्षणासाठी कायदा असताना वटहुकूम कसा काढणार?
Just Now!
X