News Flash

एकीशी प्रेम, दुसरीशी विवाह करणारा थेट कोठडीत

आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध जोडले. 

प्रातिनिधिक छायाचित्र

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : एकीशी प्रेम करून दुसरीसोबत बोहल्यावर चढणारा लग्नाच्या दोनच दिवसानंतर थेट पोलीस कोठडीत पोहोचला आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. राहुल संजय मेश्राम (२९) रा. वृंदावननगर, हसनबाग असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही मूळची बुटीबोरीची असून नागपुरात एका कंपनीत नोकरी करते. आरोपी हा बारावी शिकलेला असून स्वत:चा व्यवसाय करतो. भांडे प्लॉट परिसरात राहात असताना आरोपी व पीडित मुलीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध जोडले.  याच काळात त्याने दुसऱ्या मुलीशी विवाहगाठही जोडली. याची माहिती पीडितेला मिळाल्यावर तिने नंदनवन बसस्थानक परिसरात विष प्राशन केले व त्याची माहिती मैत्रिणीला दिली. तिची मैत्रीण भांडे प्लॉट येथील एका वसतिगृहात राहाते. ती ताबडतोब पीडित मुलीजवळ पोहोचली. तिने सामाजिक कार्यकर्त्यां सुनीता ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ठाकरे, पायल मानकर, निरज शिंदे, रोशन साळवे आणि सागर मेश्राम यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. तरुणीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. कोतवाली पोलिसांनी पीडित मुलीच्या बयाणावरून गुन्हा दाखल करून प्रकरण नंदनवन पोलिसांकडे वर्ग केले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक सुधाकर कोकोडे  करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 1:34 am

Web Title: married man arrested for molesting girlfriend in nagpur
Next Stories
1 इंधन दरवाढीचा फटका, ऑटो प्रवास महागला..
2 नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट ; एकाचा मृत्यू
3 सात लाख वीजग्राहकांकडे काळ्या यादीतील कंपनीचे मीटर
Just Now!
X