News Flash

..तर हिंदू धर्माचा त्याग!

नागपुरातील कस्तुरचंद पार्कमध्ये रविवारी मायावती यांची सभा झाली.

mayawati, reforms in Hindu religion, mayawati  convert to Buddhism
नागपुरातील कस्तुरचंद पार्कमध्ये रविवारी मायावती यांची सभा झाली.

मायावतींचा इशारा ; मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीचा अंदाज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था अधिक प्रभावी ठरू लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मात सुधारणांसाठी वेळ दिला होता. त्याप्रमाणे मीही या धर्मातील शंकराचार्य आणि प्रमुखांना संधी देत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारावा लागेल, अशी स्पष्टोक्ती बसप प्रमुख मायावती यांनी रविवारी केली. लोकसभा निवडणुका मुदतीआधीच होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

नागपुरातील कस्तुरचंद पार्कमध्ये रविवारी मायावती यांची सभा झाली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आणि भाजपला कमकुवत करण्याचे आवाहन मायावती यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले. केंद्रात मोदी सरकारला साडेतीन वर्षे झाल्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची आठवण झाली आहे. या आयोगाला संवैधानिक दर्जा दिला जाणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही राजकीय खेळी आहे. यातून ओबीसींना काहीही लाभ होणार नाही, असा दावा मायावती यांनी केला.

मतदान यंत्रात फेरफार केला जात आहे. त्यामुळे सर्व निवडणुका पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेने घेण्यात याव्यात. भाजप प्रामाणिक आहे तर मतपत्रिकेच्या मुद्यावर पळ का काढते, असा सवालही त्यांनी केला. मंत्रालयात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात आहे. आरक्षित जागा भरल्या जात नाहीत. सीबीआय आणि प्राप्तीकर खात्याचा गैरवापर केला जात असून, भाजपमधील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यात येत आहे, अशी टीका मायावती यांनी केली.

निवडणुकीपूर्वी मंदिर बांधण्याची खेळी

लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू केले जाऊ शकते. याशिवाय इतर मंदिरे बांधली जातील. त्यामुळे गरिबी आणि बेरोजगारी कमी होणार नाही. याउलट मंदिरात गेल्यामुळे तुमचा खिसा रिकामा होईल. भाजप, काँग्रेसच्या पक्षात राहून एखादा दलित मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती झाला तरी त्याचा फायदा समाजाला होणार नाही, असे मायावती म्हणाल्या.

आणीबाणीपेक्षा आजची स्थिती भयंकर

केंद्रातील सरकारचा प्रसारमाध्यमांवर मोठा प्रभाव असून, लोकशाहीला कमकुवत केले जात आहे. केंद्र सरकारचा हुकूमशाही आणि मनमानी कारभार सुरू आहे. आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती सध्या आहे, अशी टीका मायावती यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 2:01 am

Web Title: mayawati predicted pre poll for lok sabha
Next Stories
1 भिकाऱ्यांमुळेच जगण्याचा खरा अर्थ कळला
2 सरकारच्या विरोधात विरोधकांचा जनआक्रोश हल्लाबोल
3 आदर्श नागरिक घडवणारे विद्यादान सहायक मंडळ!
Just Now!
X