नागपूर जिल्ह्य़ातील ९ पालिकांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून यात विविध पालिकांमध्ये तब्बल २१ करोडपती उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक आठ करोडपती उमेदवार एकटय़ा काटोल पालिकेच्या रिंगणात आहेत, हे विशेष.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉम्स (एडीआर) आणि महाराष्ट्र ईलेक्शन वॉट या संस्थांतर्फे उमेदवारांनी प्रतीज्ञापत्रासोबत दाखल केलेल्या संपत्ती विवरणाच्या आधारावर ही माहिती गोळा केली आहे. नागपूर जिल्ह्य़ात कामठी, उमरेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, रामटेक, नरखेड ,सावनेर आणि खापा या ९ पालिकांमध्ये ८ जानेवारीला निवडणुका आहेत. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागात झालेली आर्थिक नाकेबंदी, नापिकीमुळे शेतकऱ्यांचा खालावलेला आर्थिक दर्जा आणि इतरही महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत चर्चिले जात आहेत. मात्र, महानगरातील निवडणुकांप्रमाणेच  ग्रामीण भागातील पालिकांच्या निवडणुकीतही धनदांडगे उमेदवार रिंगणात असून त्यांचे विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

nag-chart1

एडीआरने दिलेल्या माहितीनुसार या सर्व पालिकांमध्ये एकूण रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी २२ उमेदवारांची चल आणि अचल संपत्तीची बेरीज १ कोटीं कि ंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यात खाप्यासारख्या छोटय़ा पालिकेत सुद्धा एक उमेदवार रिंगणात आहे, तर संत्रा पट्टय़ातील काटोल पालिकेत सर्वाधिक ८ उमेदवारांची संपत्ती १ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे.

nag-chart2