19 September 2020

News Flash

विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करण्याचा प्रश्नच नाही

उदय सामंत यांची भूमिका; संस्कृत विद्यापीठाला भेट

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

उदय सामंत यांची भूमिका; संस्कृत विद्यापीठाला भेट

नागपूर : शासनातर्फे राज्यातील सर्व विद्यापीठांना परीक्षांच्या काळात सहकार्य करण्यासाठी आपण भेटी देत आहोत. परीक्षा घेताना शिक्षक, कर्मचारी यांना परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. त्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील विद्यापठांना भेटी देत आहे. विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करण्याचा कोणताही विचार नाही, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडली.

सामंत यांनी मंगळवारी कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे भेट देत परीक्षेचा आढावा घेतला. यावेळी विद्यापीठाद्वारे सुरू असलेल्या परीक्षेच्या कामाचे कौतुक केले. संस्कृत विद्यापीठाद्वारे १२२५ विद्यार्थी १ ते १३ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहे. अंतिम वर्षांतील ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देताना अडचणी येतील त्यांची त्या जिल्ह्यातील केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात येइल. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यापीठांनी घ्यावी, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. याशिवाय विद्यापीठामध्ये मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी आवश्यक अशी जागा उपलब्ध करून देत निधीही देण्यात येइल असेही त्यांनी सांगितले. संस्कृत विद्यापीठातील आढावा बैठकीला आमदार आशिष जयस्वाल, कुलगु प्रो. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रो. विजयकुमार उपस्थित होते.

उदय सामंत यांना अभाविप कार्यकर्त्यांची धमकी

उदय सामंत हे अमरावती विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाला भेटू न शकल्याने त्यांनी ‘तुम्ही अमरावती कसे सोडता आणि नागपूरला कसे पोहचता ते बघतोच’ अशा शब्दांमध्ये पोलिसांसमोर धमकी दिली. यामुळे अभाविपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.  शिक्षणमंत्र्यांची ही भेट म्हणजे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर गदा आणणारी असल्याचा आरोप करण्यात आला. या दौऱ्याचा निषेध म्हणून  मंगळवारी अमरावती विद्यापीठात सामंत येताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. याबाबत सामंत  म्हणाले, मी कुणाविरोधातही पोलिसात तक्रार केली नाही. मात्र, संपूर्ण प्रकार पोलिसांसमोरच घडल्याने त्यांनी कारवाई केली असावी. अशाप्रकारे धमकी देणे ही गंभीर बाब आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:12 am

Web Title: minister of higher and technical education uday samant visit sanskrit university zws 70
Next Stories
1 शहरात किमान १४ दिवसांची टाळेबंदी हवी
2 खासगी रुग्णालयाच्या मनमानीचा सत्ताधारी पक्षातील आमदारालाच फटका
3 जागतिक जैवविविधता निर्देशांकाची सातत्याने घसरण
Just Now!
X