21 March 2019

News Flash

अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार

पीडित मुलगी आपल्या आईसह आरोपीच्या शेजारी राहात असून चौथ्या वर्गात शिकत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

अजनी पोलीस ठाण्यांतर्गत घटना

मावशीच्या पतीने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची  घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. सूरज राजू गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी आपल्या आईसह आरोपीच्या शेजारी राहात असून चौथ्या वर्गात शिकत आहे. पीडित मुलीच्या वडिलाचे निधन झाले आहे. तर आई मजुरी करते. आरोपी हा कॅटरिंग व्यवसायात आहे. पीडित मुलीची आई व आरोपीची पत्नी दोघ्याही सख्या बहिणी आहेत. त्यामुळे आरोपीचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. ५ मार्च ते १ एप्रिल २०१८ दरम्यान आरोपीने पीडित ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला व वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी गप्प होती. त्यानंतर आरोपी पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असताना  गुरुवारी तिने आपल्या आईला सर्व हकिगत सांगितली. तिच्या आईने पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक के. पी. मगर यांनी भादंविच्या बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

First Published on April 14, 2018 5:53 am

Web Title: minor girl raped by relative in nagpur