05 June 2020

News Flash

सावत्र वडिलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : सावत्र वडिलाने एका अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफित दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

दीपक (५३) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. ती चार वर्षांची असताना तिचे वडील दोघांनाही सोडून गेले. त्यानंतर तिच्या आईने दीपकशी दुसरा विवाह केला. ती मजुरी करायची. तेव्हा आरोपी मुलीला सांभाळताना लहान वयापासून अश्लील चित्रफित दाखवायचा. तिला तेव्हा काही समजत नव्हते. ती मोठी झाल्यानंतर हळूहळू तिला समजायला लागले. २०१६ मध्ये एका रात्री पीडिता झोपली असताना आरोपीने तिच्या तोंडात कापड कोंबून बलात्कार केला. तसेच याची वाच्यता केल्यास तिच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने आईला सर्व हकिगत सांगितली. दुसऱ्या दिवशी ती व तिची आई त्याला सोडून दुसरीकडे भाडय़ाने राहू लागली. दरम्यान, आरोपीने तिच्या आईची माफी मागितली व पुन्हा अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे तिच्या आईने मुलीची समजूत घातली व पुन्हा आरोपीच्या घरी राहण्यासाठी आले.  यानंतर १ सप्टेंबर २०१९ ला आई कामावर गेली असताना आरोपीने तिच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर आई पुन्हा त्याचे घर सोडून मामाकडे राहण्यासाठी गेली. मामाने आरोपीला पुन्हा समजावले व त्यांना परत आरोपीकडे पाठवले. १ एप्रिल २०२० रोजी दुपारी २ वाजता आरोपीने पीडितेवर पुन्हा बलात्कार केला. तिने आपल्या आईला सांगितल्यावर आरोपीने दोघींनाही मारहाण केली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 1:28 am

Web Title: minor girl raped by stepfather zws 70
Next Stories
1 देशातील प्राणिसंग्रहालयांमध्ये अधिक दक्षता
2 महात्मा फुले योजनेत करोनाच्या समावेशाचा आदेशच नाही!
3 टाळेबंदीने शहरांमधील प्रदूषणात घट  
Just Now!
X