नागपूर : आठ वर्षांच्या मुलावर एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अनैसर्गिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना जुनी कामठी पोलीस ठाण्यांतर्गत बुधवारी उघडकीस आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलास ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. पीडित व आरोपी दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. पीडित मुलाने नुकताच चौथ्या वर्गात प्रवेश घेतला, तर आरोपीने शिक्षण सोडले असून तो आईवडिलांसह काम करतो. आज बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पीडित मुलगा घराशेजारी असलेल्या मैदानात इतर मित्रांसह खेळत होता. त्यावेळी आरोपी तेथे पोहोचला व त्याने त्याला ५ रुपये देण्याचे आमिष दाखवून  त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित मुलाच्या आईने त्याची विचारणा केली असता त्याने सर्व हकिकत सांगितली.