News Flash

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

सहा वर्षीय विद्यर्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या चालकाला नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

पोलिसांच्या सतर्कतेने प्राण वाचले

नागपूर : स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षीय विद्यर्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या चालकाला नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. व्हॅनची तोडफोड केली. संतप्त नागरिकांनी त्याचे टक्कल करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास इमामवाडय़ातील इंदिरानगर भागात घडली.

याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली आहे. आशीष मनोहर वर्मा रा. अजनी चौक, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित विद्यर्थिनी दुसऱ्या, तर तिचा १४ वर्षीय भाऊ  सातव्या वर्गात शिकतो. नेहमीप्रमाणे दुपारी तो विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होता. इंदिरानगर भागात व्हॅनमध्ये त्याने  विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणीने बघितला. तिने आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांनी आशीष याला व्हॅनबाहेर काढून चांगलाच चोप दिला. त्याचे टक्कल केले. व्हॅनची तोडफोड केली.

या घटनेने नागरिक प्रचंड संतापले. ते आशीष याला  जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान घटनेची माहिती इमामवाडा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ए.पी. जाधव ताफ्यासह तेथे पोहोचले. नागरिकांच्या तावडीतून आशीष याची सुटका केली. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. उपचारानंतर सुटी होताच उशिरा रात्री त्याला अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 12:36 am

Web Title: mob attempts to burn school van driver who sexually exploited 6 year old student zws 70
Next Stories
1 तकिया झोपडपट्टीत कुख्यात गुंडाचा खून
2 अभिनेते होण्यासाठी निघालेले शाळकरी मुले घरी परतले
3 ‘एसएनडीएल’कडून काम का काढून घेत नाही?
Just Now!
X