News Flash

मोहन भागवतांच्या नेतृत्वात मी बॉम्बस्फोट घडवले!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो.

संग्रहीत

संघाच्या माजी प्रचारकाचा खळबळजनक खुलासा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. संघाने आजवर अनेक अतिरेक्यांना जन्म दिला आहे. देशभक्तीच्या नावावर आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हाताने अनेकांचा बळी गेला, असा  खळबळजनक खुलासा आंध्रप्रदेशातील संघाचे माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

विजय शंकर यांच्या वक्तव्याचा मराठीत अनुवाद भारत वाघमारे यांनी केला. विजय शंकर म्हणले, मी बारा वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केले. यादरम्यान अनेक अनुचित गोष्टी घडल्या. ज्या चुकीच्या होत्या याची जाणीव मला झाली आणि मी संघाला रामराम ठोकला. बॉम्बस्फोटासारखे कृत्य संघाने केले असून मी देखील त्याचा एक भाग होतो. माझ्याजवळ या संदर्भातील सर्व पुरावे आहेत. संघाने माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला केला आहे. संघाचा काळा चेहरा समोर आण्यासाठी मी ‘मी देशभक्त के नाम पर आरएसएसके काले कारनामे’  हे पुस्तक काढले आहे. संघाचे काम असहाय्य झाल्याने काहींनी विष घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या देखील केली आहे. असे निराश झालेले अनेक प्रचारक माझ्या संपर्कात आहेत. अशांना घेऊन मी  लवकरच दिल्ली येथे  संघातील बढय़ा नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार असल्याचेही विजय शंकर यांनी सांगितले. या संदर्भात मी सरसंघचालक यांच्याशी आमोरा-समोर चर्चा करायला तयार असल्याचेही विजय शंकर यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:56 am

Web Title: mohan bhagwat bomb spot akp 94
Next Stories
1 पीएमसी बँक बुडवण्यात भाजप आमदाराच्या मुलाचा हात!
2 विदर्भात २२ मतदारसंघांत बंडखोरी
3 तेली समाजाची नाराजी भाजपला भोवणार?
Just Now!
X