सध्याचे सरकार हे उदासीन नसून कार्यक्षम आहे. देशात अजून बऱ्यात गोष्टी व्हायच्या बाकी आहेत. मात्र, सरकार ज्याप्रकारे काम करतयं, ते पाहून देश पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचे कौतूक केले. ते मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भागवतांनी जम्मू-काश्मीर, सर्जिकल स्ट्राईक, शिक्षणव्यवस्था, जातीव्यवस्था आणि गोरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जगात असे अनेक देश आहेत ज्यांना भारताला पुढे जाऊ द्यायचे नाही. ते देशातल्या काही स्वार्थी लोकांना हाताशी धरून कारस्थाने रचतात. पीओकेसहित संपूर्ण काश्मीर भारताचेच आहे. त्यादृष्टीने ठोस कृती होण्याची गरज असल्याचे यावेळी सरसंघचालकांनी सांगितले. तसेच भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलही भागवतांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.
यावेळी मोहन भागवत यांनी गोरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना भारतीय संविधानातच गोरक्षणाची तरतूद असल्याचे नमूद केले. त्यामुळे संविधानाच्या मर्यादेत राहूनच गोरक्षणाचे काम करण्याचा सल्ला भागवत यांनी गोरक्षकांना दिला. मात्र, संविधानातील कायद्यांचे पालन झाले पाहिजे, ते न झाल्यास गोरक्षकांना आंदोलन करावे लागते. परंतु, काही झाले तरी गोरक्षकांची तुलना समाजातील उपद्रवी घटकांशी करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सरसंघचालकांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:

* समाजातून भेदभाव, अन्याय दूर करण्यासाठी केवळ दर्शक बनू नका, संघाच्या कार्यात सहभागी व्हा- मोहन भागवत
* शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी संघाचे प्रयत्न- मोहन भागवत
* समाज जागृत आणि संघटित झाला तरच प्रशासनव्यवस्थेतील निर्णय प्रभावीपणे राबवता येईल- मोहन भागवत
* प्रबोधनासाठी गणेशोत्सव आणि दुर्गाउत्सव सार्वजनिक स्तरावर सुरू झाले- मोहन भागवत
* कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद हा शिक्षणाचाच भाग- मोहन भागवत
* समाजाने शिक्षणव्यवस्था चालवावी, मात्र त्यामुळे व्यापारीकरणाचा धोका- मोहन भागवत
* शिक्षण निरर्थक नसावे, शिक्षण समाजाधारित असावे- मोहन भागवत
* शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्यात असावे- मोहन भागवत
* सशक्त समाजासाठी शिक्षण गरजेचे- मोहन भागवत
* सनसनाटी बातम्या देण्याच्या नादात समाजात भेद निर्माण होणार नाही याची सावधानता प्रसारमाध्यमांनी बाळगण्याची गरज- मोहन भागवत
* राज्यांमध्ये वाद असतात, मात्र ते सोडविण्याची गरज- मोहन भागवत
* राज्यांमधील पक्षीय राजकारणाला मर्यादा असाव्यात- मोहन भागवत
* भारताची संघराज्यीय व्यवस्था एकत्रित राहण्याची गरज- मोहन भागवत
* फक्त केंद्र सरकारने नव्हे तर राज्य सरकारांवरही जबाबदारी- मोहन भागवत
* भारताच्या सागरी आणि जमिनीवरील सीमांच्या रक्षणासाठी सरकार, प्रशासन आणि समाजाने तत्पर राहणे गरजेचे- मोहन भागवत
* भारतीय  सीमारेषेवर कोणतीही ढिलाई आणि कसूर राहू नये- मोहन भागवत
* जगभरात भारतीय सैन्याची प्रतिष्ठा उंचावली- मोहन भागवत
* सर्जिकल स्ट्राईकबद्दल सरकारच्या नेतृत्त्वाचे अभिनंदन- मोहन भागवत
* काश्मीरमधील उपद्रवी शक्तींना सीमेपलीकडून चिथावणी दिली जाते-मोहन भागवत
* उपद्रवी शक्तींशी निर्धारपूर्वक लढा देण्याची गरज- मोहन भागवत
* पीडीपीनेही केंद्र सरकारप्रमाणे ठाम भूमिका घ्यावी- मोहन भागवत
* काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भाजप आणि पीडीपीने एकदिलाने काम केले पाहिजे- मोहन भागवत
* काश्मीरमध्ये राष्ट्रीय शक्तींचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत- मोहन भागवत
* संपूर्ण काश्मीर भारताचचे आहे- मोहन भागवत
* काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, हे कृतीतून दिसले पाहिजे- मोहन भागवत
* संविधानमान्य, विज्ञानमान्य गोरक्षकांकडे सरकारने वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे- मोहन भागवत
* गोरक्षकांची तुलना उपद्रवी वृत्तीच्या लोकांशी होऊ शकत नाही- मोहन भागवत
* संविधानातील कायद्यांचे पालन व्हावे, यासाठी गोरक्षकांना कधीकधी आंदोलन करावे लागते- मोहन भागवत
* संविधानातील कायदे आजच्या सरकारने बनवले नाहीत- मोहन भागवत
* गोरक्षकांनी संविधानाच्या मर्यादेत राहून आपले काम करावे- मोहन भागवत
* स्वार्थी लोकांकडून समाजातील दोषांचा फायदा घेतला जातो- मोहन भागवत
* काही छोट्या घटना विनाकारण मोठ्या केल्या जातात- मोहन भागवत
* आजच्या काळात जातीय भेदभावासारख्या गोष्टी घडणं लज्जास्पद- मोहन भागवत
* लोकशाहीत विरोधी पक्ष सरकारच्या टीकांवरच जास्त बोट ठेवतात- मोहन भागवत
* भारतात हातपाय पसरण्याचे या शक्तींचे प्रयत्न- मोहन भागवत
* जगात अनेक शक्तींना भारताचा प्रभाव नकोसा- मोहन भागवत
* ज्यांची दुकाने भेद आणि द्वेषावर चालतात त्यांना भारतात नकोसा- मोहन भागवत
* देशात आणखी गोष्टी करायच्या बाकी, सरकारचे प्रयत्न सुरू- मोहन भागवत
* सध्याचे सरकार कार्यक्षम, उदासीन नाही- मोहन
* यंदाचा विजयादशमी मेळावा संघासाठी खास- मोहन भागवत
* प्रसारमाध्यमात संघाच्या गणवेशाचीच जास्त चर्चा – मोहन भागवत
* सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाला सुरूवात

* देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी संघाच्या नव्या गणवेशात हजर
* विजयादशमीनिमित्त रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नव्या गणवेशात पथसंचलन