सप्टेंबर अखेरच्या आकडय़ांवरून निष्कर्ष काढणे धोक्याचे; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

नागपूर : ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ापासून उंचावलेला करोनाचा आलेख सप्टेंबरअखेर  थोडा खाली आला आहे. ही करोना साथ नियंत्रणात येत असल्याची चिन्हे आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे वेगळे आहे. ऑक्टोबर महिन्यातील  स्थितीच याबाबत स्पष्ट करेल. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येतील घसरण कायम राहते की वाढते, यावरच स्थिती नियंत्रणात आली किं वा नाही हे स्पष्ट होणार, असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मागच्या काही दिवसात तपासण्या वाढल्याने करोनाबाधितांच्या संख्येत रोज एक हजार ते पंधराशे रुग्णांची भर पडत होती. हे चित्र सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत कायम होते. जिल्हा प्रशासनालाही  सप्टेंबर महिन्यात बाधितांची संख्या एक लाखापर्यंत जाईल, असा अंदाज होता. त्यामुळे त्यांनी त्यानुसार नियोजन के ले होते. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात करोनाबाधित आणि मृत्यूसंख्येचा आलेख हळूहळू खाली येत असल्याचे दिसू लागले. चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्या कमी दिसत आहे असा दावा, विरोधी पक्षाकडून के ला जात होता तर चाचणी के ंद्राची संख्या वाढवूनही लोकच येत नसल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे म्हणणे होते. काही वैद्यकीय तज्ञ्जांच्या मते, नागपूर संसर्गाच्याबाबतीत सर्वोच्च शिखरावर गेले होते. आता ते टप्प्याटप्प्याने कमी होत जाईल. पण काहींना असे वाटत नाही. ऑक्टोबर महिन्यातील करोनाची आकडेवारीच याबाबत काय चित्र असेल  हे स्पष्ट करेल. ऑगस्ट महिन्यापर्यंत चाचण्यांची एकू ण संख्या २ लाख ५४ हजार ९१७  होती. बाधित रुग्णांची संख्या २९,५५ तर मृत्यूंची संख्या १०४५ होती. ३० सप्टेंबपर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७८ हजारावर गेली. मृत्यू २५१० वर गेले. चाचण्यांची संख्या ही ५ लाख ५१ हजारावर गेली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांची तुलना के ल्यास ऑगस्टपर्यंतच्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या ४८ हजाराने वाढली तर मृत्यूंची संख्या १४६५ ने वाढली. दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. ऑगस्टपर्यंत बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के होते ते सप्टेंबरमध्ये ८० टक्क्यांवर पोहोचले.

नागपुरात सप्टेंबरअखेर बाधित रुग्णांची आणि मृत्यूंचीही संख्या कमी झाली आहे. तपासण्या कमी झाल्या म्हणून बाधितांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी तपासणी करणाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे. शहरात करोनाची साथ शिखरावर गेली असताना उठसूठ सर्वच जण चाचण्या करीत होते. आता त्यातही घट झाली आहे. महापालिके चे आयुक्त राधाकृष्ण बी. यांनीही चाचणी के ंद्रावरील गर्दी कमी झाल्याचे मान्य के ले आहे.  या संदभरात  नागपूरच्या सुप्रसिद्ध संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे यांच्याशी संपर्क  साधला असता त्या म्हणाल्या की, सप्टेंबरच्या अखेरीस करोनाबाधित व मृत्यूंची संख्या कमी झाल्याने लगेच साथ कमी झाली असा अर्थ काढणे धाडसाचे ठरेल. मिशेन बिगीन अगेन अंतर्गत विविध व्यवसायाला व सेवांना सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढेल. तेव्हाची स्थिती काय असेल यावरच चित्र अवलंबूनअसेल.