News Flash

स्थानिकांच्या तुलनेत बाहेरच्या कंपन्यांची मदत अधिक

करोना लढय़ात प्रशासन, राजकीय नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

संग्रहीत छायाचित्र

करोना लढय़ात प्रशासन, राजकीय नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

नागपूर : जिल्ह्य़ात करोना विरोधातील लढय़ाला आर्थिक मदत करताना स्थानिक उद्योजकांनी हात आखडता घेतला असला तरी नागपूरबाहेरील उद्योजक व बडय़ा कं पन्या राजकीय नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूरला घसघशीत मदत करीत आहेत.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्य़ातील उद्योजकांना त्यांच्या सीएसआर फं डातून  करोना लढय़ासाठी आर्थिक मदतीचे आवाहन के ले होते. राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात अनेक बडे उद्योजक असताना सार्वजनिक क्षेत्रातील वेकोलि वगळता एकही कं पनी किं वा उद्योजक मदतीसाठी पुढे आले नाही.  रोज विविध सवलतींसाीठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देणारे उद्योजक नागपूर शहर संकटात असताना सरकारच्या मदतीला येत नाही, असे चित्र यातून पुढे आले आहे. दुसरीकडे नागपूरबाहेरील उद्योजक मात्र  त्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या पातळीवर मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. काही उद्योजक व उद्योजक संघटना स्वयंप्रेरणेने तर काही  कं पन्या राजकीय नेत्यांनी के लेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन करोनाविरुद्धच्या लढय़ाला  मदत करीत असल्याचे अलीकडच्या काळातील चित्र आहे.

सोमवारी पुण्याच्या मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सने ४२ प्राणवायू यंत्र भेट दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हुंदाई मोटर्सने ३० हायफ्लो प्राणवायू यंत्र नागपूरसाठी पाठवले. या यंत्राद्वारे  रुग्णांना ६० लिटर प्रतिमिनिट प्राणवायू देता येऊ शकतो. गडकरी यांच्यात पुढाकारातूनच खासगी आणि सरकारी विमा कं पन्यांच्या प्रतिनिधींची अलीकडेच नागपुरात बैठक झाली. रुग्णालयात काम करणाऱ्यांना विमा संरक्षण देण्यासंदर्भातील  ही बैठक होती.

एकीकडे बाहेरचे उद्योजक नागपूरच्या करोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे करीत असताना स्थानिक उद्योजकांनी मात्र याबाबत बाळगलेले मौन आश्चर्यकारक मानले जात आहे.

महामारीच्या संकटात जात,पात, राजकारण विसरून सर्वानी सरकारच्या पाठीशी उभे राहावे, असे  आवाहन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते करीत असले तरी प्रत्यक्षात महामारीतही राजकारणच अधिक होताना दिसत आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी निकटचे संबंध असलेले अनेक बडे उद्योजक नागपुरात आहेत. मात्र त्यांनी सरकारच्या मदतीच्या आवाहनाला दाद दिली नाही. दुसरीकडे व्यापाऱ्यांचा पक्ष अशीओळख असलेल्या भाजपातही बहुसंख्येने उद्योजक व व्यापारी आहेत, पण त्यांनी सरकारी यंत्रणेला मदत करण्याऐवजी पक्षीयस्तरावर मदतीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे करोनाही राजकारणाच्या अलिप्त राहू शकला नाही हे यातून स्पष्ट होते.

कशासाठी मदत करायची हेच माहिती नाही

यासंदर्भात बुटीबोरी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांच्याशी संपर्क  साधला असता ते म्हणाले, करोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत. स्थानिक उद्योजकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नियोजन करावे, कशासाठी मदत करायची हेच उद्योजकांना माहिती नाही, त्यामुळे अद्याप उद्योजक पुढे आले नसतील. पण प्राणवायू प्रकल्प, औषध खरेदी, रुग्णालय उभारणी किं वा तत्सम बाबींसाठी मदत हवी, असे स्पष्ट सांगतिले तर अनेक उद्योजक मदतीसाठी पुढे येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:02 am

Web Title: more help from outside companies than locals against corona fight zws 70
Next Stories
1 Coronavirus : नवीन करोनाग्रस्तांहून तिप्पट करोनामुक्त!
2 टाळेबंदीमुळे आंब्याची दर घसरण, उत्पादकांना फटका
3 करोना पळवण्यासाठी ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा अघोरी खेळ
Just Now!
X