14 August 2020

News Flash

गुण खैरातीमुळे राज्यात ८३ हजारांहून अधिक विद्यार्थी ९० टक्क्यांवर

पाच लाखांहून अधिक विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत

संग्रहित छायाचित्र

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालात गतवर्षी झालेली मोठी घट यंदा तोंडी परीक्षेच्या गुणांची भरून काढली आहे. मागील वर्षी राज्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या २८ हजार ५१६ इतकी होती. त्यात यंदा चौपट वाढ झाली असून तब्बल ८३ हजार २१६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. गुणवत्ता श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही पाच लाखांच्यावर आहे.

तोंडी परीक्षेच्या गुणांमुळे विद्यार्थी सहज उत्तीर्ण होत असल्याने त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून दोन वर्षांआधी हे गुण देणे बंद करण्यात आले होते. परिणामी, मागील वर्षी दहावीच्या निकालात राज्यात मोठी घट झाली होती. त्यामुळे ९० टक्के गुण मिळवणाऱ्यांसह गुणवत्ता श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली होती. यामुळे  मंडळाच्या कामगिरीवरही सवाल उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे गुण देण्याचा निर्णय लागू केला. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना सर्व विषयांसाठी २० गुण देण्यात आले. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुणांची आवश्यकता असते. त्यापैकी  तोंडी परीक्षेचे २० गुण मिळत असल्याने विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत  केवळ १५ गुण घ्यायचे होते. यामुळे  निकाल वाढ ल्याचे दिसून येत आहे. अशीच वाढ गुणवत्ता श्रेणीतही झाली आहे. तोंडी परीक्षेचे २० गुण मिळाल्याने ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून २०१९ मध्ये २.२९ टक्के असणारी वाढ यंदा ५.०८ टक्क्यांवर गेली आहे.

टक्केवारी     सन २०२० सन २०१९

९० टक्क्यांवर            ८३,२६२        २८,५१६

८५ ते ९० टक्के            १,२०,४८५        ५६,५१९

८० ते ८५ टक्के            १,५७,९१३         ८८,३२१

७५ ते ८० टक्के        १,७८,७१२         १,१६,६७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:23 am

Web Title: more than 83000 students in the state at 90 percent due to merit donation abn 97
Next Stories
1 दहावीतही मुलींचीच बाजी!
2 भाजी विकत असताना ९० टक्क्यांची सुवार्ता कळली
3 अत्याधुनिक रेल्वे इंजिनसाठी नागपुरात आगार
Just Now!
X