30 November 2020

News Flash

साडेसहा दशकात देशभरातील आठ कोटींहून अधिक घरांची पडझड

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालातील माहिती

(संग्रहित छायाचित्र)

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या हानीचे दृष्टचक्र वर्षांनुवर्षे देशात सुरू आहे. पूर्वसूचना देणाऱ्या विविध यंत्रणा कार्यरत असूनही यामुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अतिवृष्टी व पुरामुळे भारतात १९५३ ते २०१८ या साडेसहा दशकात साधारणपणे २१२ कोटी ५० लाख लोकांना पुराचा फटका बसला, ८ कोटी १६ लाख ३१ हजार ४०७ घरांची पडझड झाली तर ६१ लाखांहून अधिक जनावरांना प्राण गमवावा लागला.

अतिवृष्टी किंवा त्यामुळे येणाऱ्या पुरांमुळे सर्वात जास्त चर्चा पीकहानीची होते. सरकारी मदतही प्राधान्याने याच हानीपोटी दिली जाते. मात्र पीकहानी सोबतच इतर बाबींचीही मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या हानीबाबत विशेष चर्चा होत नाही. विशेष म्हणजे, पुरांमुळे स्थलांतरित होणारी जनता आणि पडलेली घरे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. नुकताच महाराष्ट्रासह देशाच्या इतरही राज्यात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात पीक हानी व घरांची पडझड झाली.

दरम्यान केंद्रातील जलशक्ती मंत्रालयाने यासंदर्भात साडेसहा दशकाची आकडेवारी जारी केली आहे. त्यावरून पीकहानीसोबतच घरे, जनावरे आणि नागरिकांना बसलेल्या फटक्यांची तीव्रता दिसून येते.

* १९५३ ते २०१८ या या काळात सरासरी  देशभरात २१२ कोटी ५० लाख नागरिक बाधित झाले.

* ८ कोटी १६ लाख ३१ हजार ४०७ घरांची पडझड झाली. त्याची किंमत ५६,२८३ कोटींहून अधिक आहे.

* ६१,०९,६२८ गुरे दगावली. २ लाख २४ हजार १९२ कोटींची सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली.

* पूरबाधित राज्यांमध्ये आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू ही प्रमुख राज्ये असून येथे झालेली हानी हजारो कोटींच्या घरात आहे.

* त्यानंतर महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांचा क्रम लागतो.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:02 am

Web Title: more than eight crore houses collapsed across the country in six and a half decades abn 97
Next Stories
1 ‘सारथी’प्रमाणे ‘महाज्योती’ला स्वायत्तता
2 साहित्य महामंडळाला ‘ऑनलाइन’ संमेलनाचे वावडे!
3 तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची दिवाळी अंधारात
Just Now!
X