जुन्या नागझिऱ्यातील वाघांचे वास्तव्य संपुष्टात
‘मदर ऑफ नागझिरा’ म्हणून ओळखली जाणारी माई उर्फ टी-२ या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे शनिवारी पिटेझरी वनपरिक्षेत्रातील चोरखामारा कक्षात दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास उघडकीस आले. तिच्या शरीरावर खोल जखमा होत्या. रानगव्याशी झालेल्या झुंजीत तिचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. माईच्या मृत्यूनंतर आता जुन्या नागझिऱ्यातील वाघांचे वास्तव्य संपुष्टात आले आहे.
माई उर्फ टी-२ ही १७ वष्रे वयाची वाघीण म्हणजे नागझिऱ्याची ओळख होती. माईने आतापर्यंत पाच वेळा बछडय़ांना जन्म घातला.
माईचा अखेरचा बछडा असलेला ‘जय’ उमरेड-करांडला अभयारण्यातील पर्यटकांचे आकर्षण आहे. नागझिऱ्यातील वाघांची संख्या तिच्यामुळेच वाढल्याने वन्यजीवप्रेमींनी तिचे नामकरण ‘मदर ऑफ नागझिरा’, तर काहींनी ‘माई’ असे केले. माईचा मृत्यू नागझिऱ्यातील अधिकारी, कर्मचारी व वन्यजीवप्रेमींना चटका लावून गेला.
सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास डॉ. वंजारी व डॉ. कडू यांनी माईचे शवविच्छेदन केले. रानगव्याशी झालेल्या झुंजीत तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक रवीकिरण गोवेकर, सहाय्यक वनसंरक्षक उत्तम सावंत, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
( Accident near Ambajogai Waghala Pati in Beed )
अपघातात नियोजित नवरदेवासह बहीण, भाची ठार; मृत रेणापूरजवळचे, अंबाजोगाईनजीकची दुर्घटना
Kolhapur
कोल्हापूर : गणपतीची मूर्ती खाली आणताना रोप वायर तुटल्याने एकाचा मृत्यू; एक जखमी