नागपूर : मानकापूर भागात विधवा महिलेसोबत लिव्ह इनमध्ये  राहणाऱ्या ३४ वर्षीय युवकाची तिच्या मुलीवरही वाईट नजर होती. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. हा चालक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. तिच्याकडे प्रवासी वाहन होते. आरोपी हा चालक असल्याने महिलेने त्याला वाहन चालवायला दिले. त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. गत काही दिवसांपासून त्याची तिच्या मुलीवर वाईट नजर होती. तो मुलीचा मानसिक छळ करीत होता.

मुलीने याबाबत महिलेला सांगितले. मुलीसह महिलेने मानकापूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. मानकापूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मानकापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक विशाल काळे, उपनिरीक्षक मनीष वाकोडे  व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मंगळवारी कुवर याला अटक केली. उद्या बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.