नागपूर : गेल्यावर्षी अचानक देशव्यापी टाळेबंदी लावून रेल्वे सेवा बंद के ल्याने शेकडो मजूर पायी चालत गेले आणि आता महाराष्ट्रात टाळेबंदी असल्याने प्रवासी मिळत नसल्याने रेल्वेगाडय़ा रिकाम्या आहेत. यामुळे रेल्वेने पुन्हा २३ गाडय़ांची रद्द करण्याची मुदत वाढवली आहे. आता नागपूर-मुंबई दुरान्तो, पुणे एक्सप्रेसह २३ गाडय़ा ३० जूनपर्यंत धावणार नाहीत.

रद्दची मुदत वाढलेल्या गाडय़ांमध्ये पुणे-नागपूर विशेष दि. १.७.२०२१ पर्यंत आणि  नागपूर-पुणे विशेष  दि. ३०.६.२०२१ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर पुणे-नागपूर विशेष दि. २४.६.२०२१ पर्यंत आणि नागपूर-पुणे विशेष दि. २५.६.२०२१ पर्यंत रद्द राहणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमरावती विशेष दि. १.७.२०२१ पर्यंत आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. ३०.६.२०२१ पर्यंत. पुणे-नागपूर विशेष दि. ३०.६.२०२१ पर्यंत आणि  नागपूर-पुणे विशेष दि. २९.६.२०२१ पर्यंत.  पुण-अमरावती विशेष दि. ३०.६.२०२१ पर्यंत आणि  अमरावती-पुणे विशेष दि. १.७.२०२१ पर्यंत.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर विशेष दि. १.७.२०२१ पर्यंत आणि नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. ३०.६.२०२१ पर्यंत.  पुणे-अजनी विशेष दि. २.७.२०२१ पर्यंत आणि अजनी- पुणे विशेष दि. २९.६.२०२१ पर्यंत.  पुणे-अजनी विशेष दि. २६.६.२०२१ पर्यंत आणि  अजनी-पुणे विशेष दि. २७.६.२०२१ पर्यंत.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना विशेष दि. ३०.६.२०२१ पर्यंत आणि जालना-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. १.७.२०२१  पर्यंत.  लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम विशेष दि. २९.६.२०२१ पर्यंत  आणि  एर्नाकुलम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ३०.६.२०२१  पर्यंत.   नागपूर -अहमदाबाद विशेष दि. ३०.६.२०२१  पर्यंत  आणि  अहमदाबाद-नागपूर विशेष दि. १.७.२०२१  पर्यंत.  नागपूर-कोल्हापूर  विशेष दि. २९.६.२०२१ पर्यंत  आणि  कोल्हापूर-नागपूर विशेष दि. २८.६.२०२१  पर्यंत  रद्द करण्यात आली आहे.