चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे निर्देश
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत असताना प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे त्याचा उपयोग ‘व्हॉट्सअॅप’चा माध्यमातून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करीत असताना महापालिकेच्या धंतोली झोनमधील आरोग्य विभागाशी संबंधीत असलेल्या एका जमादाराने काँग्रेस आणि एका समाजाविरोधात बदनामी करणारा संदेश टाकला. त्यामुळे त्या जमादाराला निलंबित करण्यात आले असून चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले.
‘व्हॉट्सअॅप’वर अश्लील संदेश पाठविण्यात आले तर त्या विरोधात सायबर क्राईमच्या माध्यमातून गुन्हा दाखल केले जाते मात्र प्रशासन पातळीवर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका कर्मचाऱ्याला ‘व्हॉट्सअॅप’वर बदनामीकारक संदेश पाठवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. प्रत्येक झोनमधील आरोग्य विभागाची माहिती संबंधीत विभागातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मिळावी या दृष्टीने महापालिकेच्या प्रत्येक झोनच्या आरोग्य विभागाचा एक ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप तयार करण्यात आला. धंतोली झोनचा असा ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप असून त्यात या झोनमधील जमादार म्हणून कार्यरत असलेले शेषराव उईके यांचा समावेश आहे. शेषराव उईके यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि एका समाजाच्या विरोधात बदनामीकारण संदेश पाठवला. काँग्रेसचे सदस्य तनवीर अहमद यांनी हा सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेत कार्यरत असलेल्या एक कर्मचारी एका राजकीय पक्षाच्या विरोधात संदेश पाठवत असताना आरोग्य विभागातर्फे मात्र त्याच्यावर कारवाई का? केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
विरोधी पक्ष विकास ठाकरे आणि प्रफुल गुडधे पाटील यांनी जमादारावर कारवाई करूनत्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी प्रशासनाकडे मागणी केली. आरोग्य अधिकारी मिलिंद गणवीर म्हणाले, प्रत्येक झोनचा असा ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप असून त्यावर रोजच्या कामासंबंधीत माहिती दिली जात असताना शेषराव उईके यांनी राजकीय पक्षाची बदनामीकारक संदेश पाठविला. त्याला समज देण्यात आली असल्याचे गणवीर यांनी सांगितल्यावर काँग्रेसचे सदस्य आक्रमक होऊन त्याचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी केली.महापौर प्रवीण दटके यांना या प्रकरणाची गंभीर दखल घेत एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात बदनामीकारण संदेश पाठवणे चुकीचे आहे आणि त्यांना तो अधिकार नाही. त्यामुळे शेषराव उईके यांना यांची चौकशी करून निलंबित करावे, असे निर्देश दिले. निलंबित आदेश निघताच त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

महापौर प्रवीण दटके यांना या प्रकरणाची गंभीर दखल घेत एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात बदनामीकारण संदेश पाठवणे चुकीचे आहे आणि त्यांना तो अधिकार नाही. त्यामुळे शेषराव उईके यांना यांची चौकशी करून निलंबित करावे, असे निर्देश दिले. निलंबित आदेश निघताच त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.