News Flash

सरकारकडून ओबीसींप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांचे वाटोळे

ठाकरे सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केल्याने या आरक्षण वाटोळे झाले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप

नागपूर : ठाकरे सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केल्याने या आरक्षण वाटोळे झाले आहे. असाच प्रकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांना लागू करण्याससंदर्भात सरकार करत आहे, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत  ठाकरे सरकाने ज्या पद्धतीने फक्त तारखावर तारखा मागितल्या आणि नाईलाजास्तव यांच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाला ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करावे लागले. आज तोच नाकर्तेपणा करत जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॉरीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकाराचे वाटोळे करायला हे ठाकरे सरकार निघालेले आहे.

केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. पण पाच वेळा उच्च न्यायालयाने तंबी देऊनही ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार टाळाटाळ करत आहे. शेवटी उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेत राज्याचे मुख्य सचिव यांना या योजनेवर निर्णय घेत कोर्टात हजर राहायला सांगितले आहे. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचे सरकार गेंडय़ाची कातडी पांघरून बसले आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:44 am

Web Title: municipal employees like obc for the government ssh 93
Next Stories
1 प्राथमिक आरोग्य केंद्रातच मुलांसाठी विशेष वार्ड
2 परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्येही घट
3 ‘एमपीएससी’च्या संयुक्त परीक्षेचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
Just Now!
X