News Flash

प्रियकराच्या खुनासाठी मित्राला शरीरसुखाचे आमिष, नागपुरातील घटना

लग्नात आठकाठी निर्माण केल्याने संताप

प्रातिनिधिक फोटो

लग्नात आठकाठी आणणाऱ्या तरुणीने त्याच्या मित्राला खुसासाठी दीड लाखांची सुपारी व शरीरसुखाच आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर सर्वांनी कट रचून प्रियकराला संपवले, या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी चौघांनी अटक केली.

गेल्या २५ फेब्रुवारीला कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काब्रा खाणीत २०० फूट खाली एक मृतदेह सापडला. त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या करुन त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मृतदेहाची ओळख पटवली. तेव्हा पाचगाव येथील चंदू गंगाधार महापूर (वय ३०) असे मृताची ओळख पटली. पोलिसांनी चौकशी केली असता तो विवाहित असून दोन मुलांचा बाप असल्याचे कळले. त्यानंतरही गावातील एका मुलीशी त्याचे अनैतिक संबंध होते. तिच्याशी तो विवाह करीत नव्हाता. तिचे आईवडील व तीने नागपुरातील एका तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला असता तो आठकाठी निर्णाण करायचा. त्यामुळे प्रेयसी व तिचे आईवदील संतापले होते. त्यांनी चंदूचा मित्र भारत वसंता गुजर (वय २५, रा सालईमेंढा) याला हाताशी धरले.

चंदूच्या प्रेयसीने भरतला चंदूला संपवण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी व शरीरसुखाचे आणिष दिले. त्यानंतर भारत हा चंदूला दारु प्यायला घेऊन गेला व खाण परिसरात नेऊन दगडाने ठेचून खून केला. जवळपास २०० मीटर मृतदेह फरफकट नेऊन खाणीत फेकला. पोलिसांना मित्रावर संशय येताच त्यांनी भारतची कसून चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी भारतहस मृताची प्रेयसी व तिच्या आईवडिलांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 12:27 pm

Web Title: murder crime lover arrest nck 90
Next Stories
1 बाळ दत्तक घेतलेल्या दाम्पत्याकडेच ताबा
2 राज्यातील ‘त्या’ उपकेंद्र सहायकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
3 मुख्यमंत्र्यांच्या सचिवासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिलासा
Just Now!
X