20 September 2020

News Flash

दोन हजार रुपयांसाठी मित्राचा खून

दोन हजार रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला.

(संग्रहित छायाचित्र)

जयताळा परिसरातील घटना

दोन हजार रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला. ही धक्कादायक घटना एमआयडीसी पोलीस हद्दीत  गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. रोशन राजेश नगराळे (१९) रा. गायत्री मंदिरजवळ, लोखंडेनगर असे मृताचे तर अजिंक्य राजेश तेलगोटे (१९) रा. रमाईनगर, जयताळा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ते दोघेही बेरोजगार होते.  रोशनने अजिंक्यला अनेकदा पाचशे, हजार रुपये उसणे दिले होते. आरोपीकडे मृताचे जवळपास दोन हजार रुपये उधार होते. त्या पैशाची मागणी रोशन करायचा. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाला. काही दिवसांपूर्वी रोशनने अजिंक्यला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याचा राग अजिंक्यच्या मनात होता. गेल्या ९ सप्टेंबरला रात्री ११ वाजताच्या सुमारास अजिंक्यने रोशनला जयताळा परिसरातील माऊली मंदिरजवळ बोलावून घेतले. चर्चेदरम्यान पुन्हा पैशाचा वाद सुरू झाला. तेथून ते दोघेही राज्य राखीव पोलीस मुख्यालयाच्या मागील भिंतीला लागून असलेल्या झुडुपाजवळ थांबले.  एका झुडपातून अजिंक्यने लोखंडी रॉड काढून रोशनच्या डोक्यात मारला. त्यानंतर विटाने चेहरा ठेचून काढला. नंतर अजिंक्यने रोशनचा मृतदेह एका खड्डय़ात लपवून ठेवला व त्यावर माती टाकली.

रोशन घराबाहेर जात असताना आपण अजिंक्यला भेटायला चाललोय, अशी माहिती दिली होती. दोन दिवस उलटल्यानंतरही मुलगा घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अजिंक्यकडे विचारणा केली. त्यावेळी अजिंक्य उडवाउडवीचे उत्तर देत होता. रोशनचे मित्रही अजिंक्यवर दबाव आणू लागले. तेव्हा अजिंक्यने आपण त्याचा खून केला असून मृतदेह लपवला असल्याची कबुली बुधवारी रात्री दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपीस अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 2:32 am

Web Title: murder friend two thousand rupees akp 94
Next Stories
1 सर्वाना मुस्लीम करण्याची जबाबदारी तुमची नाही
2 … तर घरात घुसून मारू, भाजपा कार्यकर्त्यांना काँग्रेस आमदाराची धमकी
3 रेल्वेस्थानकावर तोतया पोलिसाला अटक
Just Now!
X