28 January 2020

News Flash

अनैतिक संबंधातून महिलेचा खून

दुसरीकडे बुटीबोरी पोलीस हद्दीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न केला.

 

गिट्टीखदान पोलिसांनी छडा लावला

अनैतिक संबंधातून प्रियकरानेच महिलेचा खून करून तिचा मृतदेह फेकला होता. तो बुटीबोरी पोलीस हद्दीत सापडला होता. गिट्टीखदान पोलिसांनी या खुनाचा छडा लावून आरोपीला पकडले.

शारदा अरविंद शिंदे (३३) रा. चिंतामणीनगर असे मृत महिलेचे नाव असून चंद्रकांत एकनाथ वानी (४७) रा. शुभारंभ सोसायटी याला अटक केली आहे. शारदा ही इटर्निटी पीव्हीआर सिनेमागृहात सफाई कामगार होती. २ डिसेंबरला ती कामावरून परतली नव्हती. त्यामुळे पती अरविंद शिंदे यांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. पण, ती कामावर आली नसल्याचे समजातच गिट्टीखदान पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

दुसरीकडे बुटीबोरी पोलीस हद्दीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न केला. हा मृतदेह शारदाशी मिळताजुळता होता. पोलिसांनी व्हेरायटी चौकातील स्मार्ट सिटीचे कॅमेरे तपासले असता ती एका लाल रंगाच्या व्हॅगनआर कारमधून उतरल्याचे दिसले. त्यानंतर ती सिनेमागृहात गेली व काही वेळात पुन्हा परतली. त्यानंतर कारमध्ये बसली. कार पुढे वर्धा मार्गावर हॉटेल प्राईडपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली. पोलिसांनी कारचा क्रमांक मिळवून मालकाचा शोध घेतला असता ती कार विजय एकनाथ वानी यांच्या मालकीची असून ती त्यांचा भाऊ वापरत असल्याचे निष्पन्न झाले.

गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साजीद अहमद, इलियास शेख, युवराज ढोले, संतोष उपाध्याय, इमरान शेख, आशीष बावणकर आणि संतोष शेंद्रे यांनी चंद्रकांत वानी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने शारदासोबत अडीच वर्षांपासून आपले प्रेमसंबंध होते. त्याशिवाय तिचे इतर परपुरुषांसोबत संबंध असल्याचा संशय होता. याबाबत तिला विचारणा केली. पण, ती काहीच सांगत नव्हती. अनेक दिवस दोघांमध्ये बोलणे बंद होते. गेल्या २९ नोव्हेंबरला अचानक शारदाने भ्रमणध्वनी करून भेटायला बोलावले. त्या दिवशी वाडी परिसरातील सेवा मारुती शोरुम परिसरात भेट झाली व पुन्हा २ डिसेंबरला सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. त्यावेळीच तिच्या खुनाचा कट रचला. आरोपीने तिला कारमधून बुटीबोरी उमरेड मार्गावर नेऊन एका विहिरीत ढकलले. ती पाण्यात बुडत नसल्याचे बघून डोक्यात एक दगड घातला. यानंतर ती पाण्यात बुडाली व तिचा मृत्यू झाल्याची कबुली दिली.

First Published on December 7, 2019 12:23 am

Web Title: murder of a woman from an immoral relationship akp 94
Next Stories
1 कांद्यानंतर आता बटाटाही महागला
2 हैदराबाद चकमकीवर तीव्र प्रतिक्रिया
3 अजित पवारांना निर्दोषत्व
Just Now!
X