05 April 2020

News Flash

 बहीणीचा पतीच खुनातील आरोपी निघाला

आठ वर्षांपूर्वी हरीशने योगेश पट्टा नावाच्या एका युवकाचा खून केला होता

अनैतिक संबंधांच्या संशयातून वाद

नागपूर : काचीपुरा झोपडपट्टी परिसरात दोन दिवसांपूर्वीच्या खुनामागे मृताचा बहीण जावईच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बजाजनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे.

रामानुज चित्रसेन पटेल (३५) रा. काचीपुरा आणि भोला उग्रसेन पटेल (४२) रा. रिवा, मध्यप्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गेल्या २५ जानेवारीच्या पहाटे हरीश रघुनाथ पटेल (३५) रा. काचीपुरा याचा गळा चिरून खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू होता.

आठ वर्षांपूर्वी हरीशने योगेश पट्टा नावाच्या एका युवकाचा खून केला होता. योगेश याची हरीशच्या बहिणीशी मैत्री होती. त्यावरून त्याचा खून झाला होता. तेव्हापासून हरीश कारागृहात होता व त्याचे वडील शंकरनगर येथे चायनीच फास्टफूडचा हातठेला चालवत होते. त्या ठिकाणी रामानुज हा काम करायचा. रामानुजचे हरीशच्या बहिणीशी सूत जुळले व त्यांनी विवाह केला. पण, हा विवाह हरीशला मान्य नव्हता. दुसरीकडे भोला हा पूर्वी काचीपुऱ्यातच राहायचा. तो दादागिरी करीत असल्याने त्याचे हरीशसोबत खटके उडत होते. त्यामुळे त्याला काचीपुरा सोडून जावे लागले. पण, ठराविक दिवसांनी तो परिसरात यायचा. हरीशला दमदाटी करायचा. यादरम्यान रामानुज याचीही हरीशच्या पत्नीसोबत जवळीक वाढली होती. यावरून हरीश आपल्या बायकोवर संशय घ्यायचा व तिला मारहाण करायचा. ही बाब तिने रामानुजला सांगितली होती. तेव्हापासून त्यांच्यात वितुष्ट आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास रामानुजने भोलाच्या मदतीने हरीशचा काटा काढला. याप्रकरणी अधिक आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन आरोपींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 4:27 am

Web Title: murder over immoral relationships in nagpur zws 70
Next Stories
1 परवडणाऱ्या घर खरेदीला नागपूरकरांचे प्राधान्य
2 बांधकाम परवानगीचा तिढा कसा सुटणार?
3 उपराजधानीच्या गल्लोगल्लीत ‘नामांकित’ चहाला ‘उकळी’!
Just Now!
X