सिंधुदुर्ग जिल्ह्यतील बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे  जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती वन मंत्री  संजय राठोड यांनी दिली. ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ या प्रजातीकरिता जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

बांबर्डे येथील ग्रामपंचायत हेवाळे हद्दीतील २.५९ हेक्टर क्षेत्र ‘मायरिस्टीका स्वम्प्स’जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये ‘मायरिस्टीका’ या दुर्मिळ प्रजाती वृक्ष असून स्थानिक लोक या वृक्ष प्रजातीला देवराई संबोधतात व अनेक पिढय़ांपासून या प्रजातीचे  करत आहेत. निसर्गाच्या संवर्धनासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संघटनेने (आययूसीएन-इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर) ‘मायरिस्टीका’ प्रजाती ही दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या जैविक वारसा क्षेत्रास महत्त्व प्राप्त झाले आहे.  या क्षेत्रामध्ये या वृक्षासह विविध वृक्ष व वन्यप्राणी यांचा वावर असून ‘मायरिस्टीका’ या वृक्ष प्रजातीचे संरक्षण व जतन होणे गरजेचे आहे.  भविष्यात या प्रजातीवर संशोधन होवू शकेल. त्यासाठी हे क्षेत्र जैविक वारसा स्थळ  घोषित करण्यात आले आहे. जैवविविधतेच्या संसाधनांचे संवर्धन व शाश्वत असा विकास घडवून आणणे व त्यातून मिळणाऱ्या अनुषंगिक फायद्यांचे न्याय्य व समान वाटप करणे हा जैवविविधता कायदा आणि नियमांचा मुख्य उद्देश आहे. त्या अनुषंगाने बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे जैविक वारसा क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध
what is ring of fire
यूपीएससी सूत्र : भूकंपप्रवण क्षेत्र असलेले ‘रिंग ऑफ फायर’ अन् कचाथीवू बेटाचा वादग्रस्त इतिहास, वाचा सविस्तर…

राज्यातील चौथे जैविक वारसा क्षेत्र

शासनाने आतापर्यंत ग्लोरी अल्लापली, लांडोरखोरी जळगाव व गणेशखिंड पुणे हे क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केले होते. जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित होणारे बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे राज्यातील चौथे स्थळ ठरले आहे.