News Flash

नागनदीची संरक्षक भिंत पडली, कळमन्यात साचले पाणी

पावसामुळे शहरांतील विविध वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत

देशपांडे ले-आऊटमधील नाग नदीची पडलेली भिंत.

अनेक वस्त्यांमध्ये चिखलांचे साम्राज्य; महापालिकेवर लोकोंचा रोष
पावसामुळे शहरांतील विविध वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. देशपांडे लेआऊटमध्ये नागनदीची संरक्षक भिंत कोसळली असून कळमना भागातील विविध वस्त्यांमध्ये पाणी साचले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधील विविध वस्त्यांतील रस्ते चिखलाने माखले आहेत. या भागातील नागरिक महापालिकेवर संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पुढे होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सर्व राजकीय पक्षातील इच्छुक सक्रिय झाले आहेत.
देशपांडे लेआऊटमधील नागनदीची संरक्षक भिंत पडल्याने नागरिक भयभीत आहेत. त्यांनी नगरसेविका चेतना टांक यांना निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत बनकर यांनी या भागाचा दौरा केला. यापूर्वीही भिंत पडली होती, महापालिकेने तेथे वाळूचे पोते ठेवून तात्पुरती उपाययोजना केली होती. आता उर्वरित भाग पडला आहे, महापालिकेचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत आहे. तातडीने दुरुस्ती केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा बनकर यांच्यासह राजेश माकडे, धिरज क्षीरसागर, अविनाश पुसतोडे, संदीप नगरारे, राहुल मिरासे, आनंदी बावनकर यांनी दिला.
प्रभाग क्रमांक १५ विनोबानगरातील वस्त्यांमध्ये रस्त्यावर चिखल झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ प्रमुख सलील देशमुख, शहर अध्यक्ष आशीष नाईक, राजेश अधव, सुफी सैय्यद, संदीप खोब्रागडे यांनी या भागाची पाहणी केली. या भागातील नगरसेवक आणि आमदारांचे वस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. भारिप-बहुजन महासंघाचे सरचिटणीस डॉ. अश्विन नंदागवळी यांनी या भागाला भेट दिली. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2016 2:34 am

Web Title: nag river security wall collapse
Next Stories
1 डॉ. कोल्हे दाम्पत्याला डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान
2 भ्रष्टाचारावरून ‘नासुप्र’ अधिकाऱ्यांची गडकरींकडून झाडाझडती
3 मुन्ना यादव यांच्याविरुद्ध तरुणाचे बेमुदत उपोषण
Just Now!
X