जिल्हय़ात दिवसभरात करोनाच्या ६ हजार १८४ चाचण्या झाल्या असून त्यात ३५६ व्यक्तींना करोना असल्याचे निदान झाले. याशिवाय २४ तासांत ११ मृत्यू नोंदवले गेले.

दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये शहरातील ४, ग्रामीणचे ३, जिल्हय़ाबाहेरील ४ अशा एकूण ११ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंत दगावलेल्या व्यक्तींची संख्या २ हजार ५०७, ग्रामीण ६१८, जिल्हय़ाबाहेरील ४९० अशी एकूण ३ हजार ६१५ वर पोहचली आहे. तर २४ तासांत शहरात २६६, ग्रामीणला ८६, जिल्हय़ाबाहेरील ४ असे एकूण ३५६ नवीन रुग्ण आढळळे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ८६ हजार ४८६, ग्रामीण २२ हजार ४०४, जिल्हय़ाबाहेरील ६७२ अशी

१ लाख ९ हजार ५६१ वर पोहचली आहे. तर दिवसभरात शहरात ४ हजार ४४५, ग्रामीणला २ हजार ७३९ अशा एकूण ७ हजार १८४ चाचण्या करण्यात आल्या. त्यातून आढळलेले रुग्ण बघता सकारात्मक अहवालाचे प्रमाण ४.९५ टक्के आहे.

शहरापेक्षा ग्रामीणमध्ये करोनामुक्त अधिक

२४ तासांत शहरात ६०, ग्रामीणमध्ये ७३ असे एकूण

१३३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील करोनामुक्तांचे प्रमाण ८० हजार २३०, ग्रामीण २१ हजार ३७१ असे एकूण १ लाख १ हजार ६०१ वर पोहचले आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९२.७३ टक्के आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णसंख्या वाढतीच

जिल्ह्य़ात मंगळवारी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ३४५ नोंदवली गेली. त्यातील २ हजार ९०८ व्यक्ती गृह विलगीकरणात तर विविध रुग्णालयांत दाखल अत्यवस्थ रुग्णांची संख्या १ हजार ८१ आहे.