नागपूर : विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे पदवीधर असलेले नितीन बावनकुळे यांची गुगल क्लाऊड इंडियाच्या प्रमुखपदी वर्णी लागली आहे. जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगलने त्यांच्या ‘गुगल क्लाऊड’बिझिनेसचे भारतातील प्रमुख म्हणून मंगळवारी  त्यांची नियुक्ती केली. बावनकुळे यांनी सहा वर्षे कंपनीचा भारतातील कारभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. गुगल क्लाऊडच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने बावनकुळे आता थेट व्यवस्थापकीय संचालक (आशिया- पॅसिफिक) रिक हार्शमन यांना अहवाल सादर करतील.

बावनकुळे यांनी बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मधून पदवी घेतली आहे. तसेच ते नागपूरच्या व्हीएनआयटीच्या १९९१च्या बॅचचे पदवीधरही आहेत. त्यांनी ई-कॉमर्स, रिटेल, क्लासिफाईडस् आणि शिक्षण व्यवसाय अशा विविध क्षेत्रात विक्री विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.आमच्या चमूत त्यांना

सामावून घेऊन त्यांच्या भारतातील कामगिरीला पुढील टप्प्यापर्यंत नेण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे हार्शमन म्हणाले.